ब्रम्हपुरी तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसची बैठक संपन्न
ब्रम्हपुरी:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातील राजकीय वलय असलेला प्रमुख पक्ष आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर विदर्भात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार वेगाने होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांवर विश्वास ठेऊन अनेक कार्यकर्ते पक्षात प्रवेश करीत आहेत. यात महिलांनी सुद्धा आघाडी घेतली आहे. त्यामुळे राजकारणातील वलय, वजण व मुरब्बीपणा या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार वाढत आहे. ब्रम्हपुरी तालुक्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके ह्या होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ब्रम्हपुरी विधानसभा अध्यक्ष जगदीश उर्फ मोंटू पिलारे, तालुकाध्यक्ष वासू सोंदरकर, शहराध्यक्ष मनोज वझाडे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष नौशादभाई सैय्यद, प्रज्ञा पाटील, सरस्वती गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.
यावेळी उपस्थित महिलांच्या मुलाखती घेऊन ब्रम्हपुरी तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष म्हणून यशूदा संतोष कुथे, तालुका उपाध्यक्ष दिक्षा चहांदे, सुनिता मडावी, तालुका सचिव वैशाली पारधी, शहरकार्याध्यक्ष पदी प्रिया मोटघरे, शहर संघटक मानसी जांभुळे, जिल्हासचिव मंजूषा ठाकरे, जिल्हासंघटक दामिनी चौधरी यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके यांनी पत्र देत नियुक्ती केली. प्रसंगी पक्ष मजबूत करण्यासाठी व बुथ बांधणीसाठी चर्चा करण्यात आली.
यावेळी जोगेश्वर चौधरी, हिवराज पारधी, उत्तम पिलारे, जनता ठेंगरी, संतोष कुथे, राजेश माटे, मनोज जांभुळे व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी:- राहुल भोयर (ब्रम्हपुरी/चंद्रपूर)


0 टिप्पण्या