Advertisement

वडगाव मध्ये गुरुवारपासून सरस्वती व्याख्यानमालेला सुरुवात

वडगाव मध्ये गुरुवारपासून सरस्वती व्याख्यानमालेला सुरुवात

वडगाव मावळ पुणे:- गेल्या २१ वर्षांपासून एक सामाजिक उपक्रम मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमाला संस्थापक अध्यक्ष भास्कर म्हाळसकर,डॉ.रवींद्र आचार्य यांच्या विचारातून विविध वक्ते येऊन आपले विचार मांडले आहेत. यावर्षीही सरस्वती व्याख्यानमालेचे  आयोजिन केले आहेत.

सरस्वती व्याख्यानमालेचे गुरुवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२१ ते १४ ऑक्टोबर २०२१ दरम्यान दररोज सायंकाळी ६:३० कार्यक्रम होणार आहे.

सरस्वती व्याख्यानमालेत अनुक्रमे प्राध्यापिका डॉ. मोनिका ठक्कर, जयंत आवटे, ॲड.असीम सरोदे, ह.भ.प.चैतन्य वाडेकर, आय.ए.एस.अधिकारी अभिनव देशमुख,आय.ए.एस.अधिकारी शेखर गायकवाड,प्राध्यापिक सचिन ढोबळे, अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचे व्याख्यान होणार आहे अशी माहिती सरस्वती व्याख्यानमालेचे माजी अध्यक्ष कल्पेश भोंडवे यांनी दिली.

प्रतिनिधी:- सुखदेव जाधव (मावळ/पुणे)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या