Advertisement

मुलानेच केली वडिलांचा चाकूने भोसकून हत्या

मुलानेच केली वडिलांचा चाकूने भोसकून हत्या

टोकावडे :- वडिलांपाजिॅत शेतीच्या वाटपाच्या ‌वादातून आणि सावत्र नात्यांचा रागावरून मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना मुरबाड तालुक्यातील डोंगरन्हावे येथे घडली आहे.याबाबत मुरबाड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील म्हसा यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे या पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरन्हावे या गावातील मंगळ हरी शेळके वय 50 यांची मंगळवारी रात्री 9 वाजता त्यांचाच मुलगा रवी शेळके यांनी धारदार शस्त्राने भोसकून निघुणॅपणे हत्या केली आहे या घटने बाबतीत जयेश शेळके यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून याची कसून चौकशी उपविभागीय अधिकारी विकास नाईक व पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे हे घटनास्थळी जाऊन करत आहेत.पुढील तपास प्रसाद पांढरे यांच्या कडे आहे

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या