स्वयंभु फाऊंडेशनच्या वतीने कशाळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मास्क-सॅनिटायझर वाटप
वडगाव मावळ (पुणे):- राज्यातील शाळा सुरु झाल्या आहेत कोरोनाच्या संकटामुळे गेली वर्ष-दीड वर्ष बंद असणारी शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे फुलून निघणार म्हणुन स्वयंभु फाऊंडेशन व शालेय शिक्षण समितीच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही व त्याचा प्रसार वाढु नये म्हणुन मास्क,सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
यावेळी स्वयंभु फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी आदर्श सरपंच दत्तात्रय पडवळ, माजी आदर्श सरपंच शरद जाधव,विस्तार अधिकारी रामराव जगदाळे,माळेगांव केंद्र प्रमुख सुनिल माकर , मुख्यध्यापक बाळासाहेब मस्तुद सर,मोदी मॅडम,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नवनाथ जाधव ग्रा.प.सदस्य गणेश भांगरे,प्रशांत जाधव, मा. रा.कॉं.सोशल मीडियाचे उपाध्यक्ष मंगेश जाधव, भाऊ सुतार, रामकृष्ण जाधव,भानुदास कदम,आंदर मावळ पूर्व विभाग सोशल मीडियाचे अध्यक्ष राजेश पानसरे, दिपक पडवळ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद मोरे सर यांनी केले व आभार औटी मॅडम यांनी मानले.
प्रतिनिधी:- सुखदेव जाधव (मावळ/पुणे)


0 टिप्पण्या