शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ ब्रम्हपुरी बंद
ब्रम्हपुरी बंद यशस्वी ब्रम्हपुरी व्यावसायिकांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद.
उत्तर प्रदेशातील लखिंपुर खिरी येथील निष्पाप शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री मिश्रा यांच्या मुलाने चार चाकी वाहनाने चिरडून ठार केले या हत्याकांडाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी कडून महाराष्ट्र बंद आज दिनांक 11 ऑक्टोंबर 2019 ला पाळण्यात आले. याकरिता ब्रह्मपुरी येथील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,काँग्रेस तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांच्या वतीने ब्रम्हपुरी बंद पाळण्यात आले.
यावेळी बाईक रॅली काढण्यात आली.

रॅली ची सुरवात शिवाजी चौक येथून शहरातून कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आणण्यात आली व येथे वेगवेगळ्या पक्ष्यांच्या मान्यवरांनी लखिंपुर खिरी येथील 6 शेतकऱ्यांना चिरडून ठार मारण्यात आले याचा निषेध सर्वांनी व्यक्त केला. व केंद्र सरकारने लादलेल्या शेतकरी विरोधी शेतकरी कृषी कायद्याचे,पेट्रोल डिझेल गॅस व इतर जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढवून समस्त भारतातील जनतेवर महागाई थोपावण्यात येत आहे.यावर मान्यवरांनी आपापले मत व्यक्त केले.
तद्नंतर मोर्चा तहसील कार्यालय येथे वळवण्यात आला व राज्याचे मा.राज्यपाल यांना उपविभागीय अधिकारी तहसीलदार द्वारे निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, काँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी:- राहुल भोयर (ब्रम्हपुरी/चंद्रपूर)


0 टिप्पण्या