आमडी हिवरी ग्राम पंचायत अंतर्गत मंजुर १२१ घरकुल लाभार्त्यींच्या यादी चे वाचन करून ग्रामस्थांना माहिती सादर
दिनांक २५/१०/२०२१ सोमवार ला गट ग्रामपंचायत आमडी मध्ये ग्रामसभा घेऊन आमडी-हिवरी गावातील प्रपात्र ड, चा यादी मधील मंजुर १२१ घरकुल लाभार्त्यींच्या यादी चे वाचन करून ग्रामपंचायती मध्ये (सर्व) यांना कळविण्यात आले.
होत असलेल्या ग्रामसभेत प्रपत्र-ड यादीतील लाभार्थीचे प्रपत्र-अ, प्रपत्र-ब व प्रपत्र-क बनवून ग्रामसभेचा ठरावासह व कारणासह पंचायत समिती पारशिवनी या कार्यालयात तात्काळ सादर करावयाचे आहे.
1) प्रपत्र-अ इतर प्रवर्ग तुन अल्पसंख्यांकांची यादी वेगळी केली.
2) प्रपत्र-ब – इतर, अल्पसंख्यांक,SC, ST ची पात्र यादी तयार केली.
3) प्रपत्र-क- प्रपत्र-ड यादीतील पात्र पैकी अपात्र झालेले (इतर, अल्पसंख्यांक,SC, ST) कारणासह यादी तयार केली.
ग्रामपंचायत (सर्व) यांना कळविण्यात आले की,होत असलेल्या ग्रामसभेत प्रपत्र-ड यादीतील लाभार्थी पात्र/अपात्र असल्याचे ग्रामसभेत ठरवीले आहे. तसेच ग्रामसभेत पात्र झालेल्या लाभार्थी चे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते क्रमांक पुस्तकाची झेरॉक्स प्रत सोबत जोडून पंचायत समीतीला पाठवायची आहे. तरी लवकरात लवकर बॅक पासबुक ची झेरॉक्स लवकरात लवकर ग्रामपंचायत कार्यालयात पाठवावे.याची नोंद दिली. सरपंच गट ग्रामपंचायत आमडी-हिवरी सौ शुभांगी राजु भोस्कर.
0 टिप्पण्या