Advertisement

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने यशवंत कृषितंत्र पदविका विद्यालय, सुगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने यशवंत कृषितंत्र पदविका विद्यालय, सुगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

मुखेड/नांदेड: ग्रामीण भागातील मुलांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात म्हणून संस्थेचे सचिव श्री गंगाधर दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पदवी , कृषी पदविका व माळी प्रशिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नौकरीची संधी मिळावी म्हणून विद्यायलाच्या वतीने मुलाखती चे आयोजन करण्यात आले होते.

स्वातंत्र्य चा अमृत महोत्सव यानिमित्ताने विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम, शेळीपालन यावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या मध्ये एकूण 60 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले, तर त्यातील 9 विद्यार्थी ट्रेनी एक्सक्यूटीव्ह म्हणून एमराल्ड ऍग्रो प्रा लिमिटेड कंपनी,कोल्हापूर यात तर 6 विद्यार्थी कृषी महाविद्यालय,उदगीर येथे लॅब असिस्टंट म्हणून  निवड झाली आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री कल्याणसिंग पाटील कोल्हापूर, रणजित ठाकूर,कोल्हापूर तर अध्यक्ष म्हणून प्राचार्य किशोर सूर्यवंशी उपस्तीत होते. शेळीपालन वर मार्गदर्शन प्रा. अविनाश माने व प्रा. अमोल देवक्तते यांनी केले तर सूत्रसंचलन प्रा.सूर्यकांत नुरूदे यांनी केले. तसेच आभार प्रा. नितीन पाटील यांनी केले.

कार्यक्रम संपन्न होण्यासाठी नरसिंग वनाळे, नामदेव दिगांबार फांताडे, लोहकरे गुरुजी, प्रकाश चव्हाण, परतपुरकर ,बालाजी दिवटे, गजानन फंताडे, रमेश लवटे, प्रभू श्रीमंगले यांनी सहकार्य केले.

परिसरातील कृषी पदविका धारक, पालक व अनेक शेतकरी व विद्यार्थी सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या