मुखेड तालुक्यातील एक चोरटा जांब बाजारात बेहोश
मुखेड तालुक्यातील जांब या गावी आठवडी बाजार जनावरांचा भरतो. दर शुक्रवारी प्रमाणे आजही बाजार भरलेला होता.
आणि त्या भल्या बाजारात पंधरा सोळा वर्षाच्या मुलांना. एका वयोवृद्ध माणसाचे पैसे घेऊन पळण्याचा प्रयत्न करत होता. पैसे घेऊन तो 100 मीटर अंतर एवढा धावला होता. इतक्यात एका युवकाने त्याला पकडून ठेवले
आणि ज्या माणसाचे पैसे होते त्या माणसाला पैसे त्यांनी दिली. मग त्याच वेळेस बाजारात गलबला झाला. याला हणा या चोरट्याला मारा अशा घोषणा होऊ लागल्या आणि काही युवकांनी त्याला. मारला ही मग तो आरडाओरडा करू लागला तेव्हा त्याला सोडून देण्यात आलं, चालत चालत जाऊन मुखेड ते लातूर जाणाऱ्या हायवेवर तो चोर झोपला होता. इतक्यात जांब चौकीचे जमादार डी.एन. गीते येऊन तिथल्या सर्व युवकांना कायद्याची जाणीव करून दिली. आणि म्हणाले. तो जरी चोरी केला असेल तर त्यांना आमच्या हवाली करायचं आणि असा मारहाण करणं म्हणजेच कायदा हातात घेणे होय. हे यांचे शब्द ऐकताच सर्व युवक थंड झाले. डी.एन. गीते त्या चोरांला जांब इथे सरकारी रुग्णालयात घेऊन गेले. त्या चोरी करणाऱ्या मुलाला जेवण देऊन औषध गोळ्या देऊन त्याची चौकशी केली.
प्रतिनिधी:-अंकोश राठोड (मुखेड/नांदेड)
0 टिप्पण्या