Advertisement

पर्ह गावचे सामाजिक कार्यकर्ते बालकृष्ण दळवी यांना मारहाण करणाऱ्या आरोपीना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आदीवासी क्रांति सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश जाधव यांची तीव्र मागणी!

पर्ह गावचे सामाजिक कार्यकर्ते बालकृष्ण दळवी यांना मारहाण करणाऱ्या आरोपीना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आदीवासी क्रांति सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश जाधव यांची तीव्र  मागणी!

आरोपीना मोकाट सोडल्यास छेड़नार तीव्र आंदोलन टोकावड़े पोलीस स्टेशनला दिला ईशारा!

मुरबाड तालुक्यातील पर्ह गावचे सामाजिक कार्यकर्ते बालकृष्ण दळवी यांनी आपल्या गावातील व परिसरातील आदीवासी व गरिब लोकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिलन्यासाठी  ग्रामपंचायत पर्ह व मुरबाड पंचायत समितिच्या विरोधात उपोषणाचे बंड पुकारले होते, परंतु संबधित प्रशासनाने आश्वासन देवून त्यांची मागनी पूर्ण केली होती. त्यांच्या या सामाजिक कामाची दखल घेवून पर्ह- कांदली गावातील ग्रामस्थानी गेल्या २ महिन्यापूर्वी  त्यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परे- कांदली शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितिवर अध्यक्षपदी निवड केली होती. गावचं एवढं प्रेम मिळाल्यानंतर काही लोकांच्या पोटात दुखनारच. परंतु एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण होईल याची तिलमात्र शंका बालकृष्ण दळवी यांना नव्हती. १३ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री जेवन झाल्यानंतर ११.३० वाजताच्या सुमारास अचानक काही जनानी त्यांच्या घरात घुसुन पायावर दांडके,मातीच्या वीटा यानी जबरी मारहाण सुरु केली. खुप वेदना झाल्यावर कलले कि परे गावातील एकाच कुटुंबातील  ४जन त्याना भयंकर मारहाण करत होते.

नथू शंकर मोहपे, कातोड़ शंकर मोहपे, प्रकाश नथू मोहपे, हरेश नथु मोहपे  यानी बालकृष्ण दळवी यांच्या उजव्या पायावर जबरी मारहाण केली होती. शरीराच्या अनेक भागाना सूज आली होती.अचानक झालेल्या या मारहानीमुळे बालकृष्ण दळवी  हे बेशुद्ध पडले होते. या निषेधमय  घटनेमुळे  बालकृष्ण दळवी यांच्या आई लाही शॉक बसला. त्याना तातडीने दवाखान्यात उपचारासाठी नेन्यात आले. मात्र अजूनही चांगल्या माणसाला मारहाण करणारे हे गुन्हेगार मोकाट आहेत. सामाजिक काम करणाऱ्या बालकृष्ण दलवी यांना मारहाण करणाऱ्या ४आरोपीना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी आदीवासी क्रांति सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश जाधव यानी टोकावड़े पोलीस स्टेशन, मुरबाड तहसीलदार,आदीवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य के.सी. पाडवी, ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी मुरबाड यांच्याकडे केली आहे. सदर आरोपीना जर कड़क शिक्षा झाली नाही व बालकृष्ण दलवी यांना न्याय मिळाला नाही तर आदीवासी क्रांति सेना तीव्र आन्दोलन छेड़ेल असा ईशारा दिनेश जाधव यांनी दिला आहे.

प्रतिनिधी राजेश भांगे, मुरबाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या