ओबीसी आरक्षण रद्द होण्यास महाविकास आघाडी शासन जबाबदार: आमदार टेकचंद सावरकर
कामठी प्रतिनिधी 26 ऑक्टोबर:- फडणवीस (भाजप) सरकारने दिलेले ओबीसी आरक्षण रद्द होण्यास ठाकरे सरकार जबाबदार असून न्यायालयात प्रभावी पणे बाजू न मांडल्यानेच ओबीसी आरक्षण रद्द झाले. असे प्रतिपादन आमदार टेकचंद सावरकर यांनी यांनी केले.
ओबीसी आरक्षण रद्द होण्यास महाविकास आघाडी शासन जबाबदार :आमदार सावरकर यांचे प्रतिपादन ओबीसी जागर अभियान रथाला हिरवी झेंडी
भाजपा ओबीसी आघाडी महाराष्ट्र प्रदेश तर्फे ओबीसी जागर अभियान रथाला आज सकाळी कामठी तील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून रथाला हिरवी झेंडी दाखवून आमदार टेकचंद सावरकर यांनी रवाना केले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या प्रसंगी भाजपा ओबीसी आघाडी नागपूर-ग्रामीणचे अध्यक्ष प्रकाश टेकाडे, भाजपा ओबीसी आघाडी प्रदेश सचिव डी.डी.सोनटक्के, भाजपा ओबीसी आघाडी प्रदेश सदस्य राजेश गोलर, भाजपा ओबीसी आघाडी कामठी शहराध्यक्ष चंद्रकांत राऊत तसेच भाजपा पदाधिकारी अनिल निधान,किशोर बेले,राजेश खंडेलवाल,सुनील खानवाणी,उज्ज्वल रायबोले, कमल यादव,विजय कोंडुलवार,सुनील शिलाम,अतुल ठाकरे,संदिप पोहेकर,रवि गोयल,विक्की बोंबले,नगरसेवक लालसिंग यादव,नगरसेवक प्रतिक पडोळे,सतिश जैस्वाल,प्रमोद वर्णम,प्रविण आगाशे,येरखेडा सरपंच मंगला कारेमोरे,सरिता भोयर,ज्योती चव्हाण,प्रमोद कातोरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
प्रतिनिधी: जयंत डोंगरे,कामठी
0 टिप्पण्या