Advertisement

कैबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचा ब्रम्हपुरी शहरात जल्लोषात स्वागत

कैबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचा ब्रम्हपुरी शहरात जल्लोषात स्वागत

ब्रम्हपुरी/चंद्रपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नाम. छगन भुजबळ गडचिरोली दौर्‍यावर जात असतांना. त्यांचा ताफा ब्रम्हपुरी शहरात दाखल होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका ब्रम्हपुरीच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करीत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व ना.छगन भुजबळ समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर स्वागत केले.

ब्रम्हपुरी ते गडचिरोली रोड वरील पारडगाव फाट्यावर पारडगाव च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फार मोठ्या जोमाने मा.ना.छगन भुजबळ यांचे जंगी स्वागत केले.

राष्ट्रीय ओबीसी नेते ना.छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गाचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत केल्याबद्दल व ना.छगन भुजबळ समितीच्या शिफारशी मंत्रीमंडळाने मान्य केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका ब्रम्हपुरीच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारलेल्या शामियानात ना. छगन भुजबळ यांना पुष्पहार घालून त्यांचे जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ब्रम्हपुरीचे जेष्ठ नेते तथा चंद्रपूर मध्यवर्ती सह.बॅकेंचे संचालक दामोधरजी मिसार, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वासु सोंदरकर, ब्रम्हपुरी विधानसभा अध्यक्ष मोंटू उर्फ जगदिश पिलारे, शहर अध्यक्ष मनोज वझाडे, किसान सेलचे अध्यक्ष दुधराम आकरे,सतिश ठेंगरी, अविनाश राऊत, सोनू गेडाम,कृपाल मेश्राम, तुळशीराम कटलाम, अश्विन उपासे, राहूल भोयर, सुधिर पिलारे, राजेश माटे, जनता ठेंगरी, अतुल राऊत, अक्षय जांभुळे, नौशाद सय्यद, मुस्ताक शेख, प्रफुल करंडे, राकेश शेंडे, अमोल ठेंगरी, मिथून चौधरी, सुनिल तोंडरे, मनोहर बनपूरकर, किशोर लांबकाने, सुनिल मसराम, ओंकार पारधी, नोगेश बगमारे,किरण पिलारे, प्रशांत तलमले आदी. पदाधिकारी, कार्यकर्ते व ना.छगन भुजबळ समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते._

प्रतिनिधी- राहुल भोयर (ब्रम्हपुरी/चंद्रपूर) मो.9421815114

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या