स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन
ब्रह्मपुरी:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथे दि. 13 ऑक्टो. 2021 रोजी विधी सेवा समिती ब्रह्मपुरी तसेच महाविद्यालयातील एन.सी.सी. विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आजादीका अमृत महोत्सव आणि विधिसेवा सप्ताह दि. 02 ऑक्टो.2021 ते 14 नोव्हेंबर 2021 यानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका विधी सेवा समिती, ब्रह्मपुरीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश मा. एम.जी. मोरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अझिजूल हक यांनी भूषविले होते.
या कार्यक्रम प्रसंगी एन.सी.सी कॅडेट द्वारा संविधानातील विविध तरतुदी, शिक्षणाचा अधिकार, स्त्रियांचे अधिकार, दुर्बल घटकांचे अधिकार अशा विविध विषयांना अनुसरून जनजागृतीपर नुक्कड नाटक, मनोगते तथा गीते सादर केली. याप्रसंगी विधी सेवा समिती ब्रम्हपुरीद्वारे भारतीय संविधानावर आधारित बहुपर्यायी प्रशमंजुषा घेण्यात आली.
सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक वृंद, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.राजेश कोसे, प्रा.भीमादेवी डांगे, शिक्षकेतर कर्मचारी, एन.सी.सी, कॅडेटस, रा.से.यो. स्वयंसेवक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. तुफान अवताडे यांनी केले तर आभार एन.सी.सी.च्या लेफ्टनंट प्रा. सरोज शिंगाडे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.


0 टिप्पण्या