सांगवी जांभूळ येथे विविध विकासकामांचा पुणे जिल्हा परिषद सदस्य कृषि व पशसंवर्धन सभापती बाबुराव वायकर यांच्या हस्ते भूमिपूजन
वडगाव मावळ पुणे:-
पुणे जिल्हा परिषद,पंचायत समिती मावळ व एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यामानाने राष्ट्रीय पोषण जनजागृती अभियान सांगवी या ठिकाणी राबविण्यात आला,
यावेळी सभापती बाबुराव वायकर,मावळ पंचायत समिती सभापती ज्योती शिंदे,कुलस्वामिनी महिला बचत गटाच्या संस्थापिका सारिका शेळके,प्रकल्प अधिकारी कोतगडे सर , केंदले मॅडम इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते,राष्ट्रीय पोषण जनजागृती अभियानाच्या निमित्ताने खडकाळा बिट च्या अंगणवाडी सेविकांना अनेक पौष्टिक आहार उपयुक्त पदार्थ बनवले होते.कार्यक्रमाचे आयोजन अर्चना ढोरे यांनी केले.
तसेच कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर यांच्या फंडातून सांगवी येथे नवीन अंगणवाडी इमारतीसाठी ८.५० लक्ष रुपये व दलीतवस्ती स्मशानभूमीशेडसाठी ६ लक्ष रुपयांचा मंजूर झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन पार पडले.
यावेळी सरपंच नागेश ओव्हाळ,उपसरपंच एकनाथ गाडे,माजी सरपंच संतोष जांभुळकर,माजी सरपंच विठ्ठल मोहिते,माजी उपसरपंच विशाल वहिले,सुनील दंडेल,भाऊ ढोरे, ॲड.अक्षय रौंधळ, ग्रा.पं. सदस्य अमित ओव्हाळ,कुंदा खांदवे,कल्पना काकरे,तृप्ती जांभुळकर,स्नेहल ओव्हाळ,रुपाली गायकवाड,रखा भोईर,महादू खांदवे,बारकू खांदवे,अनिल खांदवे,मानाजी खांदवे,प्रकाश ओव्हाळ,विठ्ठल तोडकर,बाळासाहेब खांदवे,सुदाम तोडकर,युवराज तोडकर,गोपीचंद लालगुडे,माऊली खांदवे, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
प्रतिनिधी:- सुखदेव जाधव (मावळ/पुणे)



0 टिप्पण्या