Advertisement

भारत स्वतंत्र झाला पासून साखरे सराई वाडीत अध्यापही रस्ता नाही

भारत स्वतंत्र झाला पासून साखरे सराई वाडीत अध्यापही रस्ता नाही

साखरे सराई वाडीत रस्ताच नाही 32 लोकांना रस्त्यापासून केले वंचित गावकरी मेटाकुटीला आले आहेत. लोकप्रतिनिधीना वाडीत येण्यास बंदी.

माळशेज कल्याण नगर महामार्ग पासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या साखरे सराई वाडीत भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही रस्ता नसल्याने ही वाडी आजपर्यंत रस्ता पासून वंचित राहीली असून त्यांना आजपर्यंत पाण्याची सोय नाही, एक किलोमीटर चिखल तुडवीत पाणी आणावें लागत आहे.त्याच्या घराच्या बाजूने वाटरसप्लायची लाईन गेली असून सुद्धा त्यांना पाणी देत नाही.

या स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे अनेक वेळा तक्रारी केल्या असून त्याचा कडे दुर्लक्ष केले जाते असल्याचे तेथील स्थानिक ग्रामस्थ अशोक सराई.अभय सराई.अनिल सराई.

अजय सराई.विजय सराई.भगवान सराई जयराम सराई अशा 20 लोकांनी आपली भावना पुढाकार समाचार प्रतिनिधी राजेश भांगे यांच्या कडे व्यक्त केली आहे.

या वाडीत 7 घरे 32 लोकसंख्या असून या वाडीतील किरण सराई यांची पत्नी गरोदर होती तीरी दवाखान्यात नेण्यासाठी रस्ता नसल्याने त्या लोकांनी एक किलोमीटर डोली करून मग रिक्षात मुरबाड येथे घेऊन गेल्याची घटना घडली आहे.

शिवाय आजारी रुग्णांना घेऊन जाताना डोलीचा आधार घ्यावा लागत असल्याने हे लोक मेटाकुटीला आले आहेत. जर हा रस्ता लवकर केले नाही तर माळशेज नगर कल्याण रस्त्यावर बेमुदत उपोषणाचा इशारा येथील ग्रामस्थ अशोक सराई व इतर 32 लोकांनी दिली आहे.

प्रतिनिधी: राजेश भांगे (टोकावडे /मुरबाड)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या