Advertisement

ड्रॅगन पॅलेस बौद्धविहार मध्ये येणाऱ्या भाविकांच्या शौचालय व सार्वजनिक स्नानगृह बांधण्यासाठी केंद्र सरकार तर्फे 42 लाख रुपयांचा निधी मंजूर

ड्रॅगन पॅलेस बौद्धविहार मध्ये येणाऱ्या भाविकांच्या शौचालय व सार्वजनिक स्नानगृह बांधण्यासाठी केंद्र सरकार तर्फे 42 लाख रुपयांचा निधी मंजूर

कामठी :- नगरपरिषद कामठी विभाग 15

सैलाब नगर/समता नगर येथील स्थानिक रहिवाशांच्या आणि ड्रॅगन पॅलेस टेम्पल बौद्धविहार मध्ये येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी, केंद्र सरकारच्या 14 व्या वित्त आयोग योजनेच्या निधीसह सुसज्ज सार्वजनिक शौचालय-सार्वजनिक स्नानगृह बांधण्याचे काम , नुकतेच सुरू करण्यात आले आहे. केंद्र सरकारने शौचालय-सार्वजनिक स्नानगृह बांधण्यासाठी 42 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे, जिथे महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र भारतीय/पाश्चिमात्य शैलीतील शौचालये, अपंगांसाठी शौचालय आणि स्नानगृह बांधले जातील.

येत्या सहा महिन्यांत बांधकाम पूर्ण होईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

प्रतिनिधी:-जयंत डोंगरे, कामठी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या