Advertisement

ब्रह्मपुरी येथील कोट तलावामध्ये 20 वर्षीय महिलेचा बुडून मृत्यू

ब्रह्मपुरी येथील कोट तलावामध्ये 20 वर्षीय महिलेचा बुडून मृत्यू

ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी येथील बाजार चौक टिळक नगर व भवानी वार्ड लगत कोट तलाव हे प्राचीन काळापासून अस्तित्त्वात आहे. स्थानिक नगरपरिषद प्रशासनाकडून तलावाचे काही वर्षांपूर्वी अंदाजे चार करोडची निविदा काढून सौंदर्यीकरण व खोलीकरण करण्यात आले.

यामुळे तलावाच्या खोलीकरणात वाढ  झाली. यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची सुविधा  नगरपरिषदे कडून करण्यात आली नाही. त्यामुळे काही वर्षा अगोदर पोहण्यासाठी गेला असलेला एका ११ वर्षीय आकाश गांवडे या नावाच्या मुलाचा या तलावात बुडुन मुत्यु झाला होता. नंतर मौका चौकशी करून उपविभागिय अधिकारी यांनी  मुख्याधिकारी यांना सुचना फलक व सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यासाठी सांगितले. तडपचच्यात कंत्राटदारां मार्फत सुभाष लाडके या कंत्राटी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आली.

या काळात कोणत्याही प्रकारच्या दुर्घटना या तलावात घडल्या नाही. मात्र काही महिन्या अगोदर

मुख्याधिकारी नगर परिषद ब्रम्हपुरी यांनी सुरक्षारक्षक काढून घेतले आणि त्याचा दुष्परिणाम दिनांक 9 ऑक्टोंबर 2021 ला वाल्मिक नगर येथील 20 वर्षीय रेणुका मनोज गोंडाणे या महिलेचा या तलावात बुडून मृत्यू झाला.

सदर महिला मानसिक रुग्ण असल्याचे समजते.

प्रतिनिधी:- राहुल भोयर (ब्रम्हपुरी/चंद्रपूर)

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या