Advertisement

नॅशनल हायवे च्या चुकीमुळे आमडी निवसी निखील बादुले यांचा पुरात वाहून मृत्य! नॅशनल हायवे चुकीच्या कामात करणार दुरुस्ती

नॅशनल हायवे च्या चुकीमुळे आमडी निवसी निखील बादुले यांचा पुरात वाहून मृत्य! नॅशनल हायवे चुकीच्या कामात करणार दुरुस्ती

पारशिवनी:- दिनांक १४/९/२०२१ मंगळवार ला नागपुर जबलपुर नॅशनल हायवे रोड वर आमडी फाटा ओवरब्रीज च्या खाली बायपास रोड च्या पुलाचा नाल्याला आलेल्या पुरा मध्ये आमडी निवसी निखील घनश्याम बादुले हा युवक पुरामध्ये वाहुन गेला होता.

नॅशनल हायवे च्या पुलाच्या चुकीच्या बांधकामाची तक्रार व वारंवार पुलावर होत असलेल्या अपघाताची तक्रार सरपंच गट ग्रामपंचायत आमडी सौ शुभांगी भोस्कर व शिवसेना तालुका प्रमुख पारशिवनी राजू भोस्कर यांनी करून सुध्दा! नॅशनल हायवे चे अधीकारी व शासन, प्रशासनाने कोणतीच दखल, उपाय योजना व सुरक्षा व्यवस्था केलेली नाही.

दिनांक १४/९/२०२१मंगळवार ह्या घटनेचा दिवसी मृतक निखील घनश्याम बादुले यांच्या परिवारांनी व गावातील संतप्त नागरीकांनी नॅशनल हायवे नागपुर-जबलपुर रोडवर घटना स्थळी आमडी येथे चक्का जाम केला होते.

घटनास्थळी  पारशिवनी तहसीलदार  मा. प्रशांत सांगोडे यांनी योऊन तात्काळ दोन दिवसात नॅशनल हायवे सोबत मिटींग लाऊन सदर विषय मार्गी लावण्याची हमी दिली होती.

त्या अनुसंगाने दिनांक १६/९/२०२१ गुरवार पारशिवनी तहसीलचे! तहसील कार्यालय मध्ये नॅशनल हायवे च्या अधीकार्यान सोबत मिटींग घेऊन पुलचा निर्माण कामात झेलेली चुकी बाबत व तात्काळ सुरक्षा व उपाय योजनेचे कामे करण्या बाबत चर्चा करण्यात आली होती. अधीकार्यांनी घटना स्थळी जाऊन पुलाची मैका चैकशी केली. लवकरात लवकर नॅशनल हायवे चा वरीष्ट अधीकार्यांना घटना स्थळी पुलाचे नवीन निर्माण काम करण्याचा व तात्काळ सुरक्षा उपाय योजना अहवाल देऊन काम करण्याची हमी नॅशनल हायवेच्या अधीकार्यांनी आमडी सरपंच सौ शुभांगी भोस्कर यांना दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या