पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर यांचा कशाळ ग्रामस्थांच्यावतीने सत्कार
पुणे: वडगाव मावळ : कशाळ येथील श्री मळुबाई मंदिर परिसर काँक्रिटीकरणासाठी 3 लाख रुपये निधी दिल्याबद्दल पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कशाळगावातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी चर्चा करण्यात आली.

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस विठ्ठल जाधव, आंदर मावळचे युवा नेते नारायण मालपोटे, माजी आदर्श सरपंच शरद जाधव, माजी उपसरपंच तुकाराम जाधव. तंटामुक्ती अध्यक्ष नवनाथ जाधव,तंटामुक्ती समिती उपाध्यक्ष सुखदेव जाधव माजी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष रामदास जाधव मावळ तालुका सोशल मीडिया उपाध्यक्ष मंगेश जाधव, आंदर मावळ ओ.बी.सी सेलचे उपाध्यक्ष भाऊ सुतार व इतर उपस्थित होते.
यावेळी पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे व पुणे जिल्हा कृषी पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर यांच्याशी चर्चा करताना पुढील काळात गावासाठी भरीव निधी देणार असल्याचे बाबुराव वायकर यांनी सांगितले व समाज मंदिराच्या कामासाठी निधी देणार असल्याचे पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांनी आश्वासन दिले.
प्रतिनिधी:- सुखदेव जाधव (मावळ/पुणे)



0 टिप्पण्या