पुष्पगुच्छाने नव्हे तर धान्यांतून खाली लोंब निघालेल्या पेरव्याने स्वागत
ब्रम्हपुरी:- शासन व प्रशासनातील कृषी विभागाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांचा फंडा
ब्रह्मपुरी: ऊन वारा पाऊस कधी महापूर तर कधी अतिवृष्टी आणि यंदाच्या मोसमातील सततचा होणारा निसर्गचक्रातील बदल यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावातील बऱ्यांच शेतकऱ्यांच्या शेतातील धान पिकावर मावा तुडतुडा खोडकिडा करपा या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून आल्याने धान पीक संकटात सापडले आहे.
ऐन वेळी नवीन धान पिक गर्भ पोटऱ्यांत आल्यानंतर मोठ्या प्रमाणात रासायनिक औषधांची फवारणी करण्यात आली आतातरी धानपीक होतील अशी आशा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना होती मात्र ऐनवेळी पेरव्यांने(धान्य नसलेला रोग) धान पिकावर मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.
अगोदरच कर्जाच्या खाईत सापडलेल्या शिवाय त्यामुळे या उद्भवणांऱ्या संकटाच्या कचाट्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना शेतीला लागलेला खर्च कोठून काढायचा तरी कसा? असा गहन प्रश्न निर्माण झाला असल्याचे विदारक चित्र ब्रह्मपुरी तालुक्यात पाहायला मिळत आहे.
मात्र शासन व प्रशासनातील कृषी विभाग यांनी शेतकऱ्यांचा छान पिकाचा गंभीरपणे विचार करावा यासाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन येथील एका शेतकरी मित्रांने आपल्या दुसऱ्या सहकारी शेतकरी मित्रांला नवीन धान्यांतून खाली लोंब निघणाऱ्या पेरव्यांने शासन व प्रशासनातील कृषी विभागाचे लक्षवेधण्या करिता स्वागत केले
यासाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या थेट शेतावर जाऊन शेतीशाळा घेतली जाते, त्याच्यात विविध धान पिकावर आधारित शेतीविषयक माहिती पटवून दिली जात असून मावा, तुडतुडा, खोडकिडा, करपा, पेरवा, याविषयी मार्गदर्शन केले जाते. पेरव्यावर तातडीची उपाययोजना म्हणून कोराजन रासायनिक औषधाचा महाडोज दिल्या शिवाय गत्यंतर नाही आळे कृषी सहाय्यक कृषी विभाग ब्रह्मपुरी वक्तव्य.
प्रतिनिधी:- राहुल भोयर, ब्रम्हपुरी


0 टिप्पण्या