Advertisement

माळशेज घाट महामार्गवर दिवसेंदिवस वाढत आहे अपघाताचे प्रमाण

माळशेज घाट महामार्गवर वाढत आहे अपघाताचे प्रमाण

माळशेज घाट महामार्ग वर डंपर कार धडक होऊन कार चालक किरकोळ जखमी झाला आहे यात कारचे नुकसान झाले आहे. पुणे येथे नवीन कंपनी चे डंपर /हायला/ हा माळशेज घाट महामार्ग शहापूर येथे जात असता कारचालक उल्हासनगर येथून अहमदनगर येथे जात असताऺना आवळेची वाडी वळणावर समोरा-समोर धडकल्याने कारचा चक्का चूर झाला आहे. याबाबत टोकावडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून टोका

वडे पोलिस निरीक्षक संतोष दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली बगाड हवालदार पुढील तपास करीत आहेत.

मुरबाड ते माळशेज घाट या रस्त्याच्या कडेला झाडी गवत वाढल्याने दररोज कुठे ना कुठे अपघाताचे प्रमाण वाढले असून या मुळे प्रवास धोकादायक बनला आहे.

राष्ट्रीय महामार्ग कल्याण अहमदनगर माळशेज घाट हा दिवसांन दिवस प्रवास करणे धोकादायक झाले असून मुरबाड ते माळशेज घाट या रस्त्याच्या कडेला मोठी झाडी व गवत वाढल्याने रस्ता कुठे आहे हे दिसत नाही. शिवाय साईट पट्टी नाही, झेब्रा नाही, पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. ते बुजवण्याचे नाव घेत नसल्याने टोकावडे गागीॅ हाॅटेल समोर दोन महिन्यांपासून मोठा खड्डा पडला आहे. येथे चार मोटारसायकल वरून पडले असून त्यांना गंभीर दुखापती झाली आहे तरी खड्डे व गवत लवकर काढण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

प्रतिनिधी:- राजेश भांगे,मुरबाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या