Advertisement

रेशन धान्यचा गौडबंगाल! गेल्या ७ दिवसांपासून सावरोली राईस मिलमधील जप्त जीप किन्हवली पोलिस ठाण्यातच आजही जैसे थे उभी.

रेशन धान्यचा गौडबंगाल! गेल्या ७ दिवसांपासून  सावरोली राईस मिलमधील जप्त जीप किन्हवली पोलिस ठाण्यातच आजही जैसे थे उभी.

शहापूर तहसीलदार कार्यालयाला कारवाई साठी पोलिसांचे पत्र..!

संशयास्पद रित्या सावरोली येथील जय हनुमान राईस मिल आवारात पिकअप जीपमधून मध्यरात्रीच्या सुमारास महाराष्ट्र शासनाचे तांदूळ धान्य पोती उतरवतांना किन्हवली पोलिसांनी जीप जप्त केली. २९औगस्ट रोजी रात्री १०:००  वाजता  मोठ्या धाडसाने ही कारवाई केली गेली होती.

तालुक्यातील गोरगरीब व आदिवासी लाभार्थीचे वाटप केलेले रेशनिंग धान्य  परस्पर व्यापारी मंडळी खरेदी करून काळाबाजारासाठी वाहतूक करतात या संशयावरून पोलिसांनी जय हनुमान राईस मिल आवारामधील जीप रितसर पंचनामा करून किन्हवली पोलिस ठाण्यात आणली होती.

सहा.पोलीस उपनिरीक्षक पवार व पोलिस कर्मचारी चोरघे यांनी  महाराष्ट्र शासनाच्या मुद्रीत छापलेली २१ तांदूळ धान्य पोत्यांची जीप  रंगेहाथ पकडतेवेळी वाहनातील  काही अज्ञात व्यक्तीं अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांसमोरून पळून गेले होते. यामुळे पोलिसांचा संशय अधिक वाढला गेला..

दुसऱ्या दिवशी शहापूर तहसीलदार कार्यालयाला  या जप्त सरकारी मुद्देमाल बाबतीत किन्हवली पोलिसांनी पत्र पाठवून दिले होते.

जय हनुमान राईस मिल आवारात पिकअप जीपमधील तांदूळ धान्य पोती आदिवासी विकास महामंडळाचे भरडाईचे असल्याचा दावा राईस मिल चालकांनी किन्हवली पोलिस ठाण्यात येऊन सांगितला.तथापि, शहापूर तहसील कार्यालयाचे अन्न पुरवठा शाखेचे अधिकारी यांच्या चौकशी अहवालावरून पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांनी त्यांना सांगितले.

गेल्या ७ दिवसांपासून  जप्त  जीप वाहन सरकारी अहवाल अभावी  किन्हवली पोलिस ठाण्यातच आजही’जैसे थे उभी असल्याने  संपूर्ण तालुक्यात या रहस्यमय जीप गौडबंगालची नाना तर्क वितर्काची खमंग चर्चा सुरू आहे.

सरकारी रेशनिंग धान्य काळाबाजार वाहतूक की परवानाधारक भरडाईचा आदिवासी विकास महामंडळाचे धान्य या विषयावर किन्हवली पोलिस देखील संभ्रमात आहेत.

किन्हवली सहा.पो.निरीक्षक बच्छाव यांच्या शी प्रत्यक्ष संपर्क साधला असता त्यांनी शहापूर तहसील कार्यालय अहवाल अभावी पुढील पोलीसी कारवाईची असमर्थता दर्शविली.

दरम्यान,रेशनिंग धान्य परस्पर  काळाबाजारासाठी खरेदीच्या संशयावरून किन्हवली पोलिस ठाण्यात पोलिसांनी ७ दिवसांपासून जप्त केलेली जीप धान्य पोत्यांसह स्वतः च्या सुटकेसाठी आजही दिवस रात्र सरकारी अहवालाच्या प्रतिक्षेत उभीच आहे

प्रतिनिधी:- राजेश भांगे (मुरबाड/ठाणे)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या