Advertisement

पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत कांद्री वस्ती येथे चोरीचा प्रकार उघडकीस

पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत कांद्री वस्ती येथे चोरीचा प्रकार उघडकीस

शाळेच्या इमारतीच्या वालकंपाऊंड चे लोखंडी गेट, जनावर कोंडवाड्याच्या इमारतीच्या वालकंपाऊंड चे लोखंडी गेट व अंडरपास मधील नालीवर टाकलेली लोह्याची जाली चोर घेवून पसार असलेले दोन आरोपींना अटक तिसरा फरार.

मनसर कांद्री वस्ती येथे चोरांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वालकंपाऊंड चे लोखंडी गेट तसेच जनावर कोंडवाड्याच्या वालकंपाऊंड चे लोखंडी गेट व लागुन असलेल्या अंडरपास च्या नालीवर टाकलेली लोखंडी जाली असा एकुन 19,000 रु. चा माल चोरांनी लंपास केला होता.

ग्रामपंचायत चे सचिव यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करून तपासात घेतला असता कांद्री माईन येथील आरोपी विक्की बिहारीलाल कठौते व शुभम शेंडे या दोघांना अटक करण्यात आली असुन तिसऱ्या फरार आरोपी चा कसुन शोध सुरु असुन प्रकरणात उपयोगात आणलेली चार चाकी गाडी ही सापडण्याची शक्यता आहे व आरोपी ची ही वाढ हाण्याची शक्यता आहे. पुढिल तपास मनसर पोलीस चौकीचे तपास अधिकारी विलासजी केंद्रे करीत आहेत.

पुढाकार समाचार सूत्र

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या