ब्रम्हपुरी येथे संयुक्त किसान सभेचे समर्थनार्थ सर्व पक्षीय ब्रम्हपुरी बंद व मोर्चा संपन्न
ब्रह्मपुरी :
ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे संयुक्त किसान मोर्चा यांनी पुकारलेल्या संपूर्ण भारत बंदच्या समर्थनार्थ सर्व पक्षी ब्रह्मपुरी बंदचे आयोजन करून बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आले. यावेळी मोर्चाची सुरुवात ब्रम्हपुरी येथील हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन करून शांत पूर्वक तहसील / उपविभागीय अधिकारी कार्यालय ब्रम्हपुरी येथे येवुन उपविभागीय अधिकारी द्वारे भारताचे राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सर्व पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनची प्रामुख्याने उपस्थित होती.मोर्चा मध्ये ब्रम्हपुरी येथील शिवाजी चौक येथे सर्व पक्षांच्या नेत्यांनी नागरिकांना केंद्र सरकार जनतेची पिळवणूक कशी करून राहिली व शेतकऱ्यांना तीन नवीन काळे कायदे पारित करून अडाणी v अंबानींच्या हिताची ही सरकार आहे यावर भाष्य करण्यात आले. व यामुळे या सरकारचे सर्व पक्षाचे वतीने निषेध केला गेला.

येथून मोर्चा पुढे नेंवून उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बऱ्याच मोठ्या प्रमाणात नागरिक मोर्चा मध्ये सहभागी झाले.तसेच पोलीस वर्गांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती मात्र या मोर्चामध्ये कोणतेही उग्र रूप अथवा कोणालाही काहीही नुकसान झालेली नाही. तसेही ब्रह्मपुरी हे शहर शांत शहर म्हणून ओळखल्या जातोय.
मोर्चा हे अत्यंत शांत पूर्वक काढण्यात आले व शांत पूर्ण संपन्न झाले.
प्रतिनिधी: राहुल भोयर ,ब्रम्हपुरी


0 टिप्पण्या