Advertisement

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या कडे! निकृष्ठ झालेले रस्ते दुरुस्तीची मागणी

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या कडे! निकृष्ठ झालेले रस्ते दुरुस्तीची मागणी…

मुखेड : दि १८ सप्टेंबर रोजी, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांची भेट घेऊन,मुखेड तालुक्यातील अत्यंत निकृष्ट झालेले

1)उदगीर-देगलूर राष्ट्रीय महामार्गावरील रावी-मुक्रामाबाद ते गोजेगाव

2)मुक्रामाबाद,बामणी ते दापका

3)परतपूर फाटा,देगाव ते खतगाव

4)हसनाळ,भिंगोली, भेंडेगाव ते नेवळी विठ्ठल मंदिर हे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवाजिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी निवेदनातून केली आहे.

मुखेड तालुक्यातील या रस्त्यांची अवस्था अत्यंत दैनिय झाली आहे. प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेकदा या रस्त्यावरून प्रवास करणे अपघाताला आमंत्रण दिल्यासारखे होत आहे. प्रशासन आणि प्रतिनिधींचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. असा आरोप निवेदनद्वारे केले आहे.

उदगीर-देगलूर हा राष्ट्रीय महामार्ग असून या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. रोज या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या बहुसंख्य आहे. प्रवाशांना या रस्त्यावरून प्रवास करणे, अपघाताचे निमंत्रणच ठरत आहे. राष्ट्रीय महामार्गाची अवस्था निंदनीय आहे.

1)मुक्रामाबाद,बामणी ते दापका

2)परतपूर फाटा,देगाव ते खतगाव

3)हसनाळ,भिंगोली, भेंडेगाव ते नेवळी विठ्ठल मंदिर हे रस्ते त्या गावकऱ्यांची जीवनवाहिनी आहेत. या रस्त्याशिवाय गावकऱ्यांना पर्याय नाही आणि हे रस्ते खड्डेमय झालेले आहेत. यावरून प्रवास करणे अशक्य झाले आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून हे रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश संबंधीतांना द्यावेत अशी मागणी, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्र्यांकडे शिवशंकर कलंबरकर यांनी केली आहे.

 

प्रतिनिधी:-अंकोश राठोड (मुखेड/नांदेड)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या