Advertisement

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नियोजित जागेवर पुनर्स्थापित करण्यात यावा: मा.मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन सादर

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नियोजित जागेवर पुनर्स्थापित करण्यात यावा: मा.मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन सादर

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नियोजित जागेवर पुनर्स्थापित करण्यात यावा  दि. १७ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र मातंग एकीकरण समिती नागपूरचे वतीने गऊळ, ता. कंधार, जि. नांदेड येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा नियोजित जागेवरील काढण्यात आलेला पुतळा सन्मानाने पुनर्स्थापित करण्यात यावा आणि मातंग समाजातील संबंधितांवर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे याबाबत जिल्हाधिकारी नागपूर यांना एक निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मा. जिल्हाधिकारी यांचेवतीने अधिक्षक श्री काळे साहेब यांनी शिष्टमंडळाकडून निवेदन स्विकारले. यावेळी शिष्टमंडळात सर्वश्री बुधाजी सुरकार, महादेवराव जाधव, विनायकराव इंगोले, पद्माकरजी बावणे, गणेशराव साळवे व अरविंद डोंगरे हे प्रामुख्यानी उपस्थित होते.

प्रतिनिधी:-जयंत डोंगरे, कामठी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या