कन्हान पिपरी शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे महिला वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करा.
कन्हान :- कन्हान पिपरी शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे महिला वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबत तसेच कन्हान पिपरी शहरातील व ग्रामीण भागातील होतकरू क्रीडापटू युवक-युवतींसाठी क्रीडा संकुल उभारण्याबाबत किंवा उपलब्ध करण्याबाबतचे निवेदन सुनील बाबू केदार मंत्री पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री वर्धा जिल्हा तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष नागपूर सौ. रश्मीताई बर्वे यांना देण्यात आले.
कन्हान पिपरी शहर हे तालुक्यातील सर्वात मोठी नगर परिषद असुन अद्यापही प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला वैद्यकीय अधिकारी यांची आजपर्यंत स्थायी नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरातील व आजुबाजुच्या ग्रामीण भागातील उपचार घेणार्या महिलांना, युवतींना महिला वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला वैद्यकीय अधिकारीची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच कन्हान पिपरी शहरात व आजूबाजूच्या ग्रामीण क्षेत्रातील होतकरू युवक, युवती हे क्रिडापट्टू घडण्याकरीता शहरामध्ये क्रिडा संकुल उभारण्यात यावे किंवा उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. प्रशांत मसार यांच्या नेतृत्वात क्रिडा मंत्री सुनील केदार व जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांना निवेदन सादर देण्यात आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मसार, अशोक मेश्राम, पंकज गजभिये, विनोद येलमुळे, दीपक तिवाडे, रमेश ठाकरे, आनंद भुरे, मिलिंद मेश्राम, शिवशंकर भोयर, कुंदन राम गुंडे, केसरीचंद खगारे,मीना पहाडे, माधुरी गावंडे,शालू कावडे, विमल आकरे, आदी मान्यवर उपस्थित होते.


0 टिप्पण्या