Advertisement

शुक्रवारी ज्येष्ठांसाठी ‘आपली बस’मधून नि:शुल्क नागपूर दर्शन जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मनपाचा उपक्रम

शुक्रवारी ज्येष्ठांसाठी ‘आपली बस’मधून नि:शुल्क नागपूर दर्शन
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मनपाचा उपक्रम

नागपूर, ता. ३० : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्तीचे औचित्य साधून शुक्रवारी १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिका, नागपूर स्मार्ट सिटी आणि सिनियर सिटीझन कौन्सिल ऑफ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत वयाची ७५वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांसाठी मनपाद्वारे ‘आपली बस’मधून नि:शुल्क नागपूर दर्शन घडविण्यात येणार आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी दिवसभर ‘सुपर-७५’चे आयोजन करण्यात आले असून त्याअंतर्गत ज्येष्ठांना ‘आपली बस’मध्ये नि:शुल्क प्रवासासह नागपूर दर्शन करविण्यात येणार आहे.

शुक्रवारी (ता.१) दुपारी १२ वाजता मनपाच्या दहा झोनमधून दहा बस ज्येष्ठांच्या नागपूर दर्शनासाठी रवाना होतील. नि:शुल्क नागपूर दर्शन अंतर्गत ज्येष्ठांना दीक्षाभूमी, स्वामी विवेकानंद स्मारक, अजब बंगला, झिरो माईल फ्रिडम पार्क यासह शहरातील अन्य प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडविण्यात येणार आहे. यासाठी ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या झोन कार्यालयामध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे.

यासाठी लक्ष्मीनगर झोनमध्ये सहायक आयुक्त गणेश राठोड (९८२३१२८२७५), धरमपेठ झोनमध्ये सहायक आयुक्त प्रकाश वराडे (९८२३३३०९३१), हनुमान नगर सहायक आयुक्त झोनमध्ये सुषमा मांडगे (९२८४७११५१२), धंतोली झोनमध्ये सहायक आयुक्त किरण बगडे (९९२३६२१३७४), नेहरूनगर झोनमध्ये सहायक आयुक्त हरीश राउत (९७६५५५९८४२), गांधीबाग झोनमध्ये सहायक आयुक्त अशोक पाटील (९८२३१५९३७३), सतरंजीपूरा झोनमध्ये सहायक आयुक्त घनश्याम पंधरे (८६००३६७५०), लकडगंज झोनमध्ये सहायक आयुक्त साधना पाटील (७२७६९२८५७९), आशीनगर झोनमध्ये सहायक आयुक्त श्री. बावीस्कर (९८९०३२३२३३) आणि मंगळवारी झोनमध्ये सहायक आयुक्त विजय हुमने (९६७३००९१०२) यांच्याशी संपर्क साधावा.

याशिवाय १ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात स्वातंत्र्य संग्राम सैनिक, शासकीय पुरस्कार विजेते, ज्येष्ठ कलावंत, सेनेमध्ये कामगिरी करणारे सैनिक, सेवानिवृत्त अधिकारी, क्रीडा पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ नागरिक, साहित्यिक, सामाजिक, वैद्यकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येईल. दुपारी ३.३० वाजता ज्येष्ठांतर्फे गीत गायन, नकला, मनोरंजन कार्यक्रमांचे सादरीकरण होईल.

सकाळी ७ वाजता रामनगर येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे सूर्यनमस्कार स्पर्धा होईल. ‘बस फ्री राईड डे फॉर सिनियर सिटीझन’ अंतर्गत संपूर्ण दिवस ज्येष्ठ नागरिक कार्ड धारकांना ‘आपली बस’मध्ये मोफत प्रवास राहील. यासोबतच आंतरजातीय विवाह तसेच प्रेम विवाह करणाऱ्या ज्यांचे वय ७५ वर्षापेक्षा जास्त आहे अशा जोडप्यांचे देखील मनपातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. मनपाच्या दहाही झोनमध्ये प्रत्येकी एका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या