खड्ड्यांमुळे कार कोसळली 20 फुट पुलाच्या खाली
शहापूर-सापगाव रस्त्यावरील भातसा नदी पुलावरून प्रवास करत असतांना खड्डे चुकवण्याच्या नादात एका अनोळखी वाहनाने विकास शिर्के यांच्या चारचाकी कारला धडक दिली. या धडकेत कार थेट भातसानदीच्या प्रवाहात कोसळली.
शहापूर-मुरबाड-खोपोली महामार्गाच्या वातहतीमुळे या मार्गावरुन प्रवास करणारे वाहनचालक व प्रवाशी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत.तसेच सापगाव जवळील भातसा नदीच्या पुलावर जागोजागी दीड ते दोन फुटी खड्डे पडले असुन पुलाचा कठडादेखील तुटलेला आहे.या रस्त्याच्या नुतणीकरणाबाबत व डागडुजीबाबत संबंधीत यंत्रणेला शिवसेनेचे कार्यकर्ते विनायक सापळे यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करुन हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली जात आहे.मात्र कासवछाप यंत्रणेला या गंभीर समस्येकडे लक्ष द्यायला वेळ नाही.दरम्यान गाडीसह नदीपात्रात पडलेले शिर्के यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने कल्याण येथील दवाखान्यात हलविण्यात आले आहे.
यांनी दाखवले प्रसंगावधान
या दुर्घटनेची माहिती मिळताच पंकज अंदाडे,रमेश अंदाडे व मंगल हुमणे या तरुणांनी प्रसंगावधान दाखवत थेट नदीपात्रात उडी घेऊन गाडी चालक विकास शिर्के यांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. तरुणांच्या या धाडसाने त्यांच्यावर सोशल मीडियावरुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ठेकेदार व एम एस आर डीसी वर करणार गुन्हा दाखल
सदर अपघात एमएसआरडीसीच्या ढिसाळ करभरामुळे झाला असुन याला ठेकेदार आणि संबंधीत यंत्रणेचे अधिकारी जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावरच गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती शिर्के यांच्या नातेवाईकांनी बोलतांना सांगितले.
प्रतिक्रिया :-प्रशासनाने लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.या खड्डेमय मार्गावरून प्रवास करणारे सर्वच लोक आता प्रचंड संतापले असुन याचा उद्रेक झाल्यास नवल वाटायला नको.शिर्के यांचे बरेवाईट झाले असते तर याची जबाबदारी कोणी घेतली असती.-
प्रतिनिधी राजेश भांगे, मुरबाड


0 टिप्पण्या