कल्याण – मुरबाड वाहतुक कोंडीने प्रवाशी ञस्त ! ३० कि. मी. प्रवासासाठी लागतात दिड ते दोन तास !
टोकावडे:- मुरबाड कल्याण हा तीस किलोमीटर चा प्रवास सध्या प्रवाश्यांसाठी त्रासदायक ठरत असून तीस किलोमीटर साठी दीड ते पावणेदोन तास वेळ प्रवासासाठी घालवावा लागत आहे. कल्याण मुरबाड माळशेज घाट हा राष्ट्रीय महामार्ग 61 वरून रोज हजारो वाहने प्रवास करत असतात .
मुरबाड हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने नाशिक ,शिर्डी, पुणे , नगर, सिरोंचा या कडे जाणाऱ्या वाहनांची संख्या ही वाढली आहे मात्र या वाहनांना सध्या वाहतूक कोंडी सोबत इंधन खर्च ही सोसावा लागत आहे
कल्याण येथील प्रेम अॕटो पासून राष्ट्रीय महामार्ग 61 ला सुरुवात होते. राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक बदलला माञ महामार्ग आहे तसाच आहे. पुढे शहाड उड्डाण पूल वरील अनेक वर्षांपासून होत असलेली वाहतूक कोंडी तसेच म्हारळ ते कांबा या दरम्यान पडलेले खड्डे , साचलेले पाणी व चौपदरीकरणाचे रखडले प्रास्तवित काम यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन एक ते दीड तास बसावे लागते तर चालकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो त्याच प्रमाणे वाहतूक कोंडी मुळे इंधन खर्च ही वाढतो त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून होत आहे. दोन वर्षापूर्वी सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव यांनी या समस्ये विषयी म्हारळ येथे उपोषणही केले होते. राष्ट्रीय महामार्ग कल्याण विभाग वारंवार डागडुजी करताना दिसते.
नको त्या ठिकाणी मोरव्या , सरंक्षण भिंती बांधून दरवर्षी शासनाचे लाखो रुपये ठेकेदारांच्या घशात घातले जात असल्याचा आरोप हिंदुराव यांनी केला आहे. प्रवास सुखकर व्हावा यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी मुरबाड कल्याण प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुरबाडे यांनी केली आहे. गेली अनेक वर्ष कल्याण – मुरबाड रस्ताच्या रुंदिकरणाचे काम प्रलंबित असून लवकरात लवकर तो मंजुर करून प्रवाशांची वेळ व अपघाता पासून सुटका करावी तसेच म्हारळ ते कांबा या ठिकाणची रस्ताची उंची वाढवून पक्की गटारे बांधण्यात यावी यादरम्यान पडलेले खड्डे त्वरित बुजवले नाही तर लवकरच जनआंदोलन उभारले जाईल . –
रमेश हिंदुराव , सामाजिक कार्यकर्ते. या ठिकाणी काॕंक्रीटिकरणाचे काम मंजुर झाले असून दिवाळीनंतर हे काम सुरु होणार आहे. दरम्यान सध्या पडलेले खड्डे पाऊस कमी होताच गणपती पूर्वी भरले जातील. दिनेश महाजन , कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग .
प्रतिनिधी:- राजेश भांगे (टोकावडे)


0 टिप्पण्या