Advertisement

टोकावडे खापरी येथे विद्युत लाईन तुटल्यांनी करंट लागून म्हैस जागीच ठार

टोकावडे खापरी येथे विद्युत लाईन तुटल्यांनी करंट लागून म्हैस जागीच ठार

टोकावडे/ठाणे:- टोकावडे खापरी येथे विद्युत तार तुटून एका शेतकऱ्याची म्हैस जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे.

खापरी येथील बाबू रामचंद्र पवार यांची म्हैस रस्त्याच्या कडेला चरत असताना हाय वोल्ट लाईन तुटल्याने ती जागीच ठार झाली असून याबाबत टोकावडे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या नंतर लगेच टोकावडे पोलिस निरीक्षक संतोष दराडे यांनी हवालदार नितीन घाग यांना पंचनामा साठी पाठवले व लगेच पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नितीन घाग करत आहेत.

प्रतिनिधी:- राजेश भांगे टोकावडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या