कन्हान चे भविष्य सुरक्षित आहे का ?
कन्हान:-
कन्हान ची न्याय व्यवस्था खुब लाचर छालेली दिसुन येते आहे, पोलिसांचे धाक वचक राहिलेले नाहि या विषयाची गंभीरता लक्षात घेत सर्व पक्षाचे दुसर्या व तिसर्या फळिचे कार्यकर्ता व पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते यांची सभा डोनेकर सभागृहात संपण. कन्हान मध्ये नविन (PI) ठाणेदार एक सक्षम नेतृत्व व कर्तव्य दक्ष कार्यतत्पर अधिकारी म्हणून नेमणूक करावे यासंदर्भात आज दि.25/08/21 बुधवार सायंकाळी 7 वा. ङोणेकर सभागृह कन्हान येथे सभा (बैठक) आयोजित केलेली होती.
येत्या काही दिवसात कन्हान पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांची बदली होत असून त्यांच्य जागेवर नवीन पोलीस इन्स्पेक्टर येणार असून विध्य्मान पोलीस इस्पेक्टर सारखे नसावे. अशी अपेक्षा बाळगत सभा घेण्यात आली व सभेची वाटचाल
येणार्या काळात खुब गुन्हेगारी क्षेत्रात मध्ये वाढ होणार आहे व सध्या कन्हान मध्ये सुद्धा गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे, तरी सामान्य जनतेचा सामाजिक सुरक्षतेचा दृष्टिकोनातून हि बैठक महत्त्वपूर्ण समजली जात होती. सर्व प्रतिष्ठित मान्यवरांना, पत्रकार महोदयांना , नगरसेवक व अन्य इतर कन्हान सामान्य नांगरीकांनी आपल्या हक्क व सुरक्षेसाठी या बैठकीत उपस्थित होते. हि सभा कुठल्याही एका पक्षाला केद्रित करत नसून कन्हान शहराचे सूत्र सक्षम पोलीस अधिकारी च्या हाती देण्यात यावे ह्या करीता सर्व पक्षीय सभा आयोजित करण्यात आली होती.
कांग्रेस, शिवसेना , राष्ट्रवादि , भाजप , मनसे , प्रहार , बसपा , वंचित बहुजन आघाडी
पत्रकार व इतर नगरवासी व इतर प्रभागातील प्रतिनिधित्व करणारे मान्यवर ह्या सभेत प्रामुख्यानी उपस्तीठ होते


0 टिप्पण्या