Advertisement

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे अपशब्द विरोधात मुरबाड मध्ये शिवसेना पक्ष तर्फे जाहीर निषेध मोर्चा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे अपशब्द विरोधात मुरबाड मध्ये शिवसेना पक्ष तर्फे जाहीर निषेध मोर्चा

टोकावडे/ठाणे:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या बद्दल बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी केद्रिय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी मुरबाड मध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

भाजप चे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात कोंबडी चोर व सायकल चोर असे पोस्टर लाऊन व हाती घेऊन जाहीर निषेध करण्यात आले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या जन आशिर्वाद यात्रे दरम्यान मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या बद्दल अक्षेपार्य वक्तव्य केल्या मुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना युवासेना यांच्या वतीने आंदोलन व ठिकठिकाणी बीजेपीचे कार्यालय फोडण्याचे प्रकार घडले. आशाच प्रकारे मुरबाड येथे जि.प उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा मुरबाड पोलिस ठाण्यासमोर करण्यात आला या वेळी शहर अध्यक्ष राम दुधाळे, कांतिलाल कंटे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी नारायण राणे यांना अटक करा आशा घोषणा देण्यात आल्या

प्रतिनिधी:- राजेश भांगे/मुरबाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या