महाआवास योजनेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्राम पंचायत व व्यक्तींचा सत्कार
पारशिवनी:- सर्वांसाठी घरे २०२२’ शासनाच्या या धोरणांतर्गत प्रधानमंत्री महाआवास योजना आणि राज्य पुरस्कृत शबरी व रमाई महा आवास योजना अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्राम पंचायत व वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांचा महाआवास अभियान पुरस्कार व महाआवास अभियान विशेष पुरस्कार वितरण समारंभ पंचायत समिती सभागृह पारशिवनी येथे संपन्न झाला.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा खणीकर्म विकास मंडळाचे अध्यक्ष ॲड.आशिष जयस्वाल तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद नागपूरच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, पंचायत समिती पारशिवनीच्या सभापती मीना कावळे, उपसभापती चेतन देशमुख, तहसीलदार प्रशांत सांगडे,पंचायत समिती सदस्य संदीप भलावी, करुणा भोवते, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना भोयर, माजी पंचायत समिती सदस्य मंगला निंबोने, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रदीप दियेवार , गट विकास अधिकारी अशोक खाडे, सहाय्यक गट विकास अधिकारी चंद्रकांत देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वांसाठी घरे २०२२ या शासनाच्या धोरणांतर्गत घरकुलाच्या बांधकामास गतीमान करणे व गुणवत्ता आणणे यासाठी २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत प्रधानमंत्री महाआवास ग्रामीणअभियान आणि राज्यपुरस्कृत रमाई,शबरी महाआवास ग्रामीण अभियान राबविण्यात आले होते. शासनाच्या निकषानुसार ग्राम पंचायत व व्यक्तिगत स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यामध्ये प्रधानमंत्री महा आवास अभियान अंतर्गत प्रथम पुरस्कार ग्राम पंचायत केरडी, द्वितीय पुरस्कार ग्राम पंचायत पालोरा,तृतीय पुरस्कार ग्राम पंचायत नांदगाव यांना तर राज्य पुरस्कृत रमाई,शबरी महा आवास ग्रामीण अभियान अंतर्गत ग्राम पंचायत पालोरा प्रथम, ग्राम पंचायत केरडी द्वितीय तर ग्राम पंचायत डूमरी कला तृतीय पुरस्काराचे मानकरी ठरले. वैयक्तिक पातळीवर घरकुलाचे उत्कृष्ट बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये प्रधानमंत्री महा आवास ग्रामीण अभियान अंतर्गत प्रथम पुरस्कार किसना नीलकंठ हिवसे (केरडी), द्वितीय पुरस्कार दशरथ नामदेव काठोके (केरडी),तृतीय पुरस्कार नितीन मोहने (आमडी) यांना तर राज्य पुरस्कृत रमाई, शबरी महा आवास योजना अंतर्गत भीमाबाई दाजीबा गेडाम (तामसवाडी) प्रथम, बापूराव गणपत शिवारे (तामसवाडी) द्वितीय तर शैलेश प्रकाश मेश्राम (सालई मोकासा) यांना तृतीय पुरस्कार प्राप्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक खुशाल कापसे यांनी, प्रास्ताविक गट विकास अधिकारी अशोक खाडे तर आभार प्रदर्शन सहाय्यक गट विकास अधिकारी चंद्रकांत देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखा अभियंता अंगद जाधव, कनिष्ठ अभियंता युवराज खोपे, स्थापत्य सहाय्यक मनोहर जाधव, डाटा एंट्री ऑपरेटर विनोद भोगे, घरकुल अभियंता मयूर घारड, देवानंद तुमडाम, विनोद घारड यांनी सहकार्य केले
प्रतिनिधी:- प्रतिनिधी:-प्रा.निता ईटनकर,पारशिवनी



0 टिप्पण्या