नवोदय जनोत्थान संघटन कन्हान नी वृक्ष वितरण करूण साजरा केला ७५ वा स्वतंत्रता दिवस
कन्हान/पारशिवनी:- दिनांक १५ ऑगस्ट स्वतंत्र दिवस विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान इथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला, संघटन अध्यक्ष प्रवीण गोडे यांनी माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. तसेच महात्मा गांधी, छत्रपति शिवाजी महाराज, माहात्मा जोतीबा फुले, भारत माता, भगतसिंह, लालबहादुर शास्त्री, यांच्या प्रतीमेला माल्यार्पण करण्यात आले व मानवंदना देण्यात आली.
तिरंगा झेंड्याला मान वंदना सलामी देऊन राष्ट्रीय गीत घेण्यात आले. गावातील नागरीकांना तसेच पत्रकारांना वृक्ष वितरण करण्यात आले व बुंदी वितरण केले. भारत देशाला स्वतंत्रता सेनानी विरांच्या जिवनावर संघटन सचिव प्रदीप बावने, सह सचिव अभिजित चांदुरकर, कोषाध्यक्ष सतीश उके, ज्ञानेश्वर दारोडे, सोनु मसराम, महेश शेंन्डे, आनंद भाऊ बेलसरे,यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमा चे सुत्रसंचालन अखिलेश मेश्राम व आभार संघटन उपाध्यक्ष संजय रंगारी यांनी केले.
कार्यक्रमदिनी नविन सभासदांनी प्रवेश केले दिनेश नारनवरे, चंद्रशेखर वंजारी, चंदु पानतावने, दिपनकर गजभिये,विक्रांत माहोरकर यांचे प्रवेश होऊन कार्यक्रमात मनिष शंभरकर, प्रकाश कुर्वे, सोनु खोब्रागडे, प्रवीण माने, अरूण थापा, पंकज राम टेके, आकाश पंडीतकर, मुकेश गंगराज, योगेश मोहोड,शरद यादव.. आदि मान्यवर उपस्थिति होते.
0 टिप्पण्या