कसारा घाटमधील राणी अहिल्यादेवी होळकर बारव प्राचिन ऐतिहासिक स्थळाला, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह-बँकेच्या अध्यक्षा रोहिणी एकनाथ खडसे यांची भेट
नाशिक:- मुंबईवरून नाशिकला जातांना मध्यवर्ती कसारा घाटात असणाऱ्या राणी अहिल्यादेवी होळकर बारव (टोप बारव) या प्राचिन ऐतिहासिक स्थळाला जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी एकनाथ खडसे यांनी भेट दिली
मुंबई वरून नाशिक जात असताना कसारा घाटात उजव्या बाजूला ही गोल घुमटाकार वास्तु दिसून येते. साधारण उलट्या टोपलीच्या आकाराची किंवा घुमट समान ही प्राचीन वास्तु लक्षवेधी आहे
पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी, प्राचिन काळी रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवासी वाटसरू यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून या विहीर (बारव) चे निर्माण केले होते.

बारव मुख्य रस्त्यापासून ५० फुट अंतरावर आहे. ४० फुट व्यासाची बारव पुर्ण दगडी बांधकामात सुबक पद्धतीने बांधलेली आहे. झाड, पाला, जंगली प्राणी पडुन पाणी दुषित होऊ नये तसेच उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून त्यावर अर्ध-गोलाकार घुमट बांधला असुन, पाणी काढण्यासाठी त्याला तिन बाजुंनी तिन अर्ध-गोलाकार आकाराच्या खिडक्या सोडत गोल घुमट बनवले आहे. दगडी शिळा एकमेकांवर ठेवत महालाच्या घुमट समान हे छत्र बनवतांना बारवच्या सौंदर्यात अजुनच भर टाकत तिची स्वच्छताही ठेवण्याचे काम केलेले दिसते. या बारवचा निर्माण महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी केला असल्यामुळे या घुमट बारवला किंवा टोप बारवला स्थानिक महाराणी अहिल्यादेवी बारव नावाने देखील ओळखतात.
प्रतिनिधी:- राजेश भांगे,टोकावडे


0 टिप्पण्या