असद चाऊस यांनी गरजू व गरीब जनतेला मदत म्हणून..! वाढदिवसाचे अवचीत्य साधून केली प्रत्येकी २-किलो साखर वाटप
असद चाऊस यांनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोरगरीब जनतेला प्रत्येकी दोन-किलो साखर वाटप करण्यात आली आहे.
ठाणे :- महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज संघटना चे संस्थापक अध्यक्ष असद चाऊस राष्ट्रवादी लोकनेते यांच्या वाढदिवसानिमित्त 9 आगष्ट्र रोजी ठाणे येथील जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यालयात त्यांची पत्नी श्रतुजा जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते गोरगरीब जनतेला दोन किलो साखरेचे वाटप करण्यात आले आहे. कोरोना काळात गोरगरीब जनता उपाशी पोटी आपल्या उदरनिर्वाह करत होते, याची जाणीव ठेवून गरीबांना काही तरी मदत करायचे या हिशेबानी त्यांनी ही संकल्पना मांडली आणि 9-आगष्ट्र हा त्यांचा वाढदिवस साजरा न करता गरीबांना २किलो साखर दान करण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज संघटनेचे अध्यक्ष आसद याहीया चाऊस यांचा वाढदिवस या निमित्त ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस हेमंत वाणी यांच्या वतीने प्रभाग क्र. १२ मधील नागरिकांना मोफत साखर वाटप करण्यात आली.
यावेळी सदर कार्यक्रम प्रसंगी संघर्ष संस्थेच्या महिला अध्यक्षा सौ.ऋता जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे शहर महिला अध्यक्षा सुजाता घाग.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या ठाणे शहर अध्यक्षा पल्लवी जगताप,
ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस हेमंत वाणी हे व इतर मान्यवर उपस्थित होते
या वेळी समाजसेवीका ऋता आव्हाड यांचे हस्ते स्थानिक नागरिकांना प्रत्येकी 2 किलो साखरेचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या संसाराला थोडे फार हातभार लाभावे या उद्देशाने आपल्या वाढदिवसा निमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज संघटनेचे अध्यक्ष आसद चाऊस यांनी या वेळी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितले सदर साखर वाटपाचा स्थानीक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आसद चाऊस यांच्या सोबत सोनू माळी हे देखील उपस्थित होते
प्रतिनिधी:-राजेश भांगे (मुरबाड)


0 टिप्पण्या