पी एम किसान योजनेच्या पैसासाठी टि.डि.सी बॅंकेच्या रांगेत जेष्ठ नागरिकांना ताटकळत राहिल्याने चक्कर येऊन जेष्ठ नागरिक पडल्याने डोक्याला दुखापत,
टोकावडे :- जेष्ठाना रांगेत उभे न करता पटापट त्यांची कामे व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. बॅंकेत रांगेत उभा असताना आली भुरल रुग्णालयत दाखल
टोकावडे येथील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे पैसे काढण्यासाठी रांगेत उभा असलेल्या एका वृद्धाला भूरल आल्याने रांगेतच कोसळून बेसूद पडल्याची घटना मंगळवारी घडली आहे.
रघूनाथ शेलवले रा.मादोशी वनोटे हे 60 वर्षय वृद्ध टोकावडे येथील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सकाळी 11 वाजता पी-एम किसान योजनेच्या पैसे काढण्यासाठी रांगेत उभे होते या वेळी त्यांना भुरल आल्याने ते खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना रांगेत उभे न करता त्यांना पहीले पटापट काम करून देणे अशी मागणी करण्यात येत आहे.
प्रतिनिधी:- राजेश भांगे (मुरबाड)


0 टिप्पण्या