Advertisement

जिल्हा परिषद पुणे पशुसंवर्धन सभापती श्री.बाबुराव आप्पा वायकर यांचा बऊर गावात सत्कार

जिल्हा परिषद पुणे पशुसंवर्धन सभापती श्री.बाबुराव आप्पा वायकर यांचा बऊर गावात सत्कार

पुणे:-

जिल्हा परिषद पुणे पशुसंवर्धन सभापती श्री.बाबुराव वायकर यांच्या फंडातून बऊर गावात विविध विकास कामांसाठी 2.50 कोटीचा निधी उपलब्ध झाला. या निधीतून गावातील रस्ते, समाजमंदिर व इतर कामे करण्यात येणार आहे.या निमित्ताने गावातील आजी-माजी सरपंच यांनी श्री. बाबुराव वायकर यांचा हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये पी. डी.सी.सी. बँक उपाध्यक्ष माऊली दाभाडे माजी सरपंच मारुती वाळुंज, सरपंच संदीप बबन खिरीड, प्रवीण भवार, शंकर शिंदे,
माजी अध्यक्ष रा.यु.काँ पवन मावळ हनुमंत खिरीड, विजय भवार,ग्रामपंचायत संघटना अध्यक्ष
गणेश वाळुंजकर माजी उपसरपंच चिखलसे बाळासाहेब काजळे कैलास वाळुंज, गणपत वाळुंज,चंद्रकांत गायकवाड,सचिन शिंदे, भरत गायकवाड,रवी भवार यावेळी प्रामुख्यानी उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच मारुती वाळुंज,तसेच सरपंच संदीप बबन खिरीड यांनी आभार मानले.

प्रतिनिधी:- सुखदेव जाधव(पुणे)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या