Advertisement

शिरोशी भागात बिबट्याची धुमाकूळ...! 70 गावठी कोंबड्या केल्या फस्त गावकरी भयभीत

टोकावडे:-बिबट्या ने आदिवासी नागरिकांच्या 70 कोंबड्या केल्या फस्त शिरोशी भागात बिबट्याची धुमाकूळ 70 गावठी कोंबड्या केल्या फस्त गावकरी भयभीत झाले आहे.

 

टोकावडे शिरोशी येथील आदिवासी कातकरी समाजातील भिमा मधू वाघ यांच्या गावठी कोंबड्या पोल्ट्री फार्म हाऊस असून येथे बुधवारी रात्री एका बिबट्याने पोल्ट्री चा दरवाजा तोडून आत प्रवेश करून 300 पैकी 70 गावठी कोंबड्या फस्त केल्या असून याबाबत टोकावडे वनविभाग यांच्या कडे तक्रार दाखल केली आहे.

 

शिरोशी भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून परीसरातील नागरिक भयभीत झाले आहे.या बिबट्याचा तोरीत बंदोबस्त करावा अशी मागणी भिमा मधू वाघ यांनी वनविभागात केली आहे.

प्रतिनिधी:- राजेश भांगे (मुरबाड)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या