प्रवासी बस फेरी संख्या वाढवण्यास बहुजन मुक्ति पार्टी चे विभागीय नियंत्रकास निवेदन
नागपूर:- बहुजन मुक्ति पार्टी नागपुर शहर कार्यकारिणी तर्फे मा. निलेश बेलसारे, विभागीय नियंत्रक परिवहन महामंडल नागपुर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रवासी बस संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांना प्रवास करणास त्रास सहन करावा लागतो व त्यामुळे प्रवाशांना अनेक अड़चनीना सामोरे जावे लागते. शिवाय कमी बस फेरया मुळे परिवहन महामंडलला आर्थिक तोटा सहन करावा लागतो. प्रवाशांना होनारा त्रास कमी करण्यासाठी व परीवहन महामंडळाच्या आर्थिक तोटा दूर करण्यासाठी प्रवासी बस फेरी वाढवीन्यात यावी अन्यथा बहुजन मुक्ति पार्टी तर्फे अशा त्रासलेल्या प्रवाशांचा सहाय्याने परीवहन महामंडळाच्या विरोधात आंदोलन पुकारन्यात येईल व त्याला परीवहन महामंडळ जवाबदार असेल,असे सांगण्यात आले.
या शिष्टमंडळात प्रामुख्याने अनिल नागरे, कार्याध्यक्ष बहुजन मुक्ति पार्टी नागपुर शहर ,सुनील नारनवरे, बहुजन मुक्ति पार्टी, पूर्व नागपुर विधानसभा प्रभारी ,प्रमोद भगत, मंगेश मेश्राम उपस्थित होते.



0 टिप्पण्या