कन्हान नगर पालिका येथे रिक्त पद भरून न दिल्यास दिनांक ०५-जुलै-२०२१ रोजी कन्हान नगर पालिके समोर शिवसेना पदाधिकारी तर्फे उपोषण..! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन
कन्हान:- वर्ष२०१४ पासून ग्रामपंचायत कन्हान चे ‘क’ वर्गाची नगर परिषदेत गठन झाले होते. कार्यालयाचे नगर परिषदेत रुपांतर होऊनही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संवर्गीय तथा रिक्त पदांवर कर्मचारी उपलब्ध झाले नाही. त्यामुळे नागरिकांचा हितासाठी होणारे कामे प्रलंबित होत आहे सोबत शासकीय कामे करण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहे. तसेच शासनास वेळोवेळी आवश्यक असलेली माहिती पुरविण्यात उशीर लागतो आहे. ह्या गोष्टीचा देखील जनतेला खूप आक्रोश आहे. सध्या कार्यरत कर्मचाऱ्यावर इतर विभागाच्या कामाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे. कन्हान नगर परिषद च्या क्षेत्रात जवळपास ५० हजार च्या वर लोकसंख्या आहे व जनतेला नगर पालिका कार्यालयात छोट्यात छोट शासकीय काम करायला देखील ताटकळत राहावं लगते. परंतु सोपविण्यात आलेला भार अधिकच होत असल्याने रिक्त पदांवर कर्मचारी उपलब्ध झाल्यास दैनंदिन कामे तसेच अनुषंगिक कामे सुरळीतपणे पार पडण्यास मदत होईल.
तसेच महाराष्ट्रराज्यात शिवसेना महाविकास आघाडी सरकार आहे तरी सुद्धा आवश्यक कामाला प्रलंबित केल जात आहे.
महाराष्ट्र राज्यातील रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार व रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार, हे शिवसेना पक्षाचे आहे. तसेच नगर परिषद कन्हान ता.पारशिवनी, जिल्हा.नागपूर येथे नगराध्यक्षा व उपाध्यक्ष हे देखील शिवसेना पक्षचे असून सुद्धा कन्हान मधील नागरिकांची विडम्बना…!
सर्व सत्ता शिवसेना पक्ष ची असून ही अद्यापही सदर कार्यालयात रिक्त पदांवर कर्मचारी उपलब्ध झाले नाही हि अत्यंत लज्जास्पद बाब आहे. असे शिवसेना पदाधिकारी ह्यांनी आपल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच शहरातील नागरिकांच्या हितातील कामे होत नसल्याने पदाधिकारी व नगरवासियांचा प्रश्नाचे उत्तर देणे कठीण झाले आहे असे सांगितले जात आहे. कन्हान नप नगराध्यक्षा मार्फत खूपदा मुख्यमंत्री साहेबांना पत्राद्वारे कळविण्यात आले, याबाबत अनेकदा पत्र व्यवहार करण्यात आले होते. दिलेल्या पत्राला सज्ञान घेऊन नगर परिषद कन्हान-पिपरी तह.पारशिवनी जि.नागपूर येथे तत्काळ रिक्त पदांवर कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावी. असे निवेदन शिवसेना पदाधिकारी द्वारे सादर करण्यात आले. जर का पत्राला प्रतिसाद मिळाला नाही तर येत्या दिवसाचे आत कर्मचारी उपलब्ध न झाल्यास दिनांक ०५ जुलै २०२१ रोजी कार्यालय नगर पालिका कन्हान समोर शिवसेना पक्षा तर्फे उपोषण करण्यात येईल यांची नोंद घ्यावी असेही स्पष्ट सांगितले जात आहे.
रामटेक क्षेत्रात शिवसेना पक्षाचे आमदार व खासदार असून सुद्धा कन्हान नगर परिषद हतबल…!
रामटेक क्षेत्रात शिवसेना पक्षाचे आमदार व खासदार असून सुद्धा कन्हान नगर परिषद हतबल आहे… त्याचा बरोबर कन्हान नगर परिषद मध्ये सुद्धा अध्यक्ष व उपाध्यक्ष हे शिवसेना पक्षाचे आहे. तरी सुद्धा शिवसेना आपल्या कामापासून दुरावा बनून ठेवला आहे. ‘क’ वर्गातील कन्हान नगर परिषद असून सुद्धा कन्हान नगर परिषद ला स्थाई मुख्याधिकारी नाही. आता पर्यत कन्हान मध्ये स्थायी मुख्याधिकारी लाभलेला नाही… ह्यासाठी कारणीभूत कोण? तेच जनप्रतिनिधी ज्यांना जनतेने विश्वास करून जिंकून आणले. पन त्याच लोकांनी जनतेचा विश्वास घात केला ह्यासाठी तिळ मात्र शंखा नाही. काबर कन्हान मधील जनतेला विकास कामापासून वंचित ठेवाल जात आहे…? ह्या प्रश्नाचे उत्तर आमदार व खासदार यांना द्यावेच लागेल. कन्हान नगर परिषद माध्ये फक्त ४ स्थायी प्रशासकीय प्रभारी आहेत आणि इतक्या मोठ्या नगर परिषद च्या परिसराला प्रशासकीय काम करण्यासाठी ४ प्रशासकीय प्रभारी सक्षम आहे का? एक अधिकारी ४ पदावर कार्य करीत आहे. अस्या गंभीर विषयावर कोणी समोर यावा? जेव्हा जनप्रतिनिधी गप्प आहेत. प्रत्येक विभागाचे प्रभारी सलग्न असावे जेणेकरून प्रशासकीय कार्यात गती प्रदान व्हावी पन असे न होता गतीला आणखी आणखी मंदावल जात आहे. हा कन्हान च्या जनतेचा विश्वास घात आहे. कन्हान ची जनता माफ करणार नाही. मुख्याधिकारी हे कन्हान नगर परिषद ला आता पर्यंत स्थायी नाही…. मग प्रशासकीय कामाची मध्यस्ती कोणी करावी, जेव्हा मुख्याधिकारी ला कन्हान नप क्षेत्रा विषयी माहित होतो तर काही दिवसाच्या आत त्यांची बदली केली जाते… ह्याचा सर्वात जास्त त्रास नागरिकांना होतो व त्यांचा कामाला खोळवले जाते.
कन्हान नगर परिषद ची स्थाई अधिकारी व प्रभारी नसल्यानी दयनीय अवस्था


0 टिप्पण्या