मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील बस फेऱ्या कोरोना काळापासून बंद…! बस फेऱ्या सुरु करण्याची नागरिकांची मागणी
टोकावडे(ठाणे) मुरबाड दि. 30:-मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील बस फेऱ्या कोरोना काळापासून बंद असून अनेक गावातील नागरिक बस फेऱ्या सुरु कराव्यात यासाठी मुरबाड आगारात मागणी करत आहेत मात्र या मागणीला फक्त आश्वासन देऊन परत पाठवले जाते ,पण यामुळे मुरबाड आगारातील कारभारावर नाराजी व्यक्त असून ग्रामीण भागातील जनतेने कामकाजापासून आणखी किती दिवस दूर रहायचे असा सवाल केला जात आहे
तालुक्यातील मुरबाड औद्योगिक क्षेत्रासह , कल्याण , डोंबिवली, ठाणे मुंबई या ठिकाणी नोकरीसाठी जातात तर तालुक्यातील भाजीपाला व्यापारी ही शहरात भाजीपाला घेऊन येतात त्यासाठी ग्रामीण भागातील बस ही महत्त्वाचा पर्याय ठरतो मात्र तालुक्यातील असोसे , करवेळे , विढे, ठुने-पाडाळे , कोलठण , या भागातील नागरिक ग्रामीण फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी करत आहेत तर अनेक राजकिय पदाधिकारी वर्गाने ही मागणीचे पत्र मुरबाड आगाराकडे दिले मात्र या मागणीला अजूनही यश येत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे त्यामुळे ग्रामीण फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे,
प्रतिनिधी:- राजेश भांगे, मुरबाड



0 टिप्पण्या