Advertisement

नगर पंचायत पारशिवनी अंतर्गत ज्ञानविकास कला प्रतिष्ठान संस्था, नागपूर द्वारे पारशिवनी मध्ये लसीकरण जनजागृती अभियान विद्यमान

नगर पंचायत पारशिवनी अंतर्गत ज्ञानविकास कला प्रतिष्ठान संस्था, नागपूर द्वारे पारशिवनी मध्ये लसीकरण जनजागृती अभियान विद्यमान

 

पारशिवनी:- लसीकरण जनजागृती करणार्या सर्व अंगणवाडी सेविका यांचे ज्ञानविकास कला प्रतिष्ठान नागपूर-पारशिवनी च्या वातिनी अभिनंदन करण्यात आले.

संत तुकाराम सभागृह पारशिवनी येथे दुसर्या टप्यापासून लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले असून लसीकरण संपूर्ण पारशिवनी तालुक्यात व्हावी ह्या करीता सर्वत्र, जनजागृती करण्यात येत आहे.गावोगावी गृहमेटी, पथनात्य स्वरूपात तसेच योग्य मार्गदर्शनाने अशा वर्कर तसेच अंगणवाडी सेविका,सामाजिक सेवा करणाऱ्या समाज सेविका, संस्था सभासद कार्यकर्ते,शिक्षक-शिक्षिका, कर्मचारी, आरोग्य विभागातील  व संपूर्ण विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच नगर पंचायत,पंचायत समिती, पूर्णतः कार्यरथ आहे.खंड विकास अधिकारी अशोक खाडे,तसेच नगर पंचायत मुख्याधिकारी अर्चना वंजारी,यांच्या पुढाकाराने लसीकरणाची सुर्वात करून लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले.पारशिवनी तालुक्याचे तहसीलदार वरूनकुमार  सहारे यांनी राशन धारकांना लस गरजेची आहे असे सांगून दक्षता विभागाच्या समितीद्वारे कृतीशील प्रयत्नातून संपूर्ण तालुका कोरोना मुक्त करण्याचा अभियान चालविला.

ह्या सर्वांच्या अनुमतीने कोरोना लसीकरण जनजागृती ठिकठिकाणी झालीच पाहिजे, या करिता १ मे महाराष्ट्र दिनापासून सर्व सर्व सामाजिक संस्था,यांच्या द्वारे जनजागृती मोहीम राबविण्यात आले. ह्या वेळी ज्ञानविकास कला प्रतिष्ठान द्वारे कोरोनाच्या पहिल्या टप्यात माझे कुटुंब माझी जबादारी  जागृती मोहिम राबविण्यात आली होती. कोरोनाच्या दुसर्या लाटेला सुद्धा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात लासिकार्नाच्या जनजागृती करीता सज्ज आहे. गावोगावी, छोट्या-मोठ्या गावी, खेडे गावी प्रत्यक्ष भेटी देऊन देऊन पथनाट्य, मार्गदर्शन,करण्यात आले.

तसेच नगर पंचायत पारशिवनी येथील संत तुकाराम सभागृह येथे जनजागृती करून लसीकरण करण्यास जनतेला पाठविण्याचे कार्य करीत आहे. ह्या कार्याकरिता संस्था अध्यक्षा प्रा. निता ईटनकर यांनी पुढाकार घेऊन.. लसीकरण जनजागृतीचे कार्य सुरु आहे.

ह्या मध्ये सर्व शिक्षक वर्ग आरोग्य कर्मचारी आशावर्कर अंगणवाडी सेविका, दक्षता समिती, महिला सुरक्षा समिती,महिला  मंडळ, सर्व परिचारिका, सामाजिक संस्था,तसेच पंचायत समिती व नगर पंचायत इत्यादीचे पारशिवनी तालुक्याचे तहसीलदार वरूनकुमार सहारे यांनी धन्यवाद मानले.

प्रतिनिधी:- प्रा.निता ईटनकर,पारशिवनी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या