Advertisement

सरपंच गट-ग्रामपंचायत आमडी-हिवरी च्या वतीने लसीकरण करण्याचे जनजागरण व अधिसुचना..! सौ. शुभांगी भोस्कर

सरपंच गट-ग्रामपंचायत आमडी-हिवरी च्या वतीने लसीकरण करण्याचे जनजागरण व  अधिसुचना..! सौ. शुभांगी भोस्कर

आमडी/हिवरी(पारशिवनी):-  सरपंच गट-ग्रामपंचायत आमडी-हिवरी च्या वतीने लसीकरण करण्याचे जनजागरण व सुचीत करण्यात येत आहे की उद्या दिनांक १०/६/२०२१/ गुरवार ला सकाळी ९ वाजता हिवरी जिल्हा परीषद शाळे मध्ये ४५ वर्ष वयोगटा वरील सर्व नागरीकांना वैक्सीन चा पहीला डोज देण्यात येणार आहे.ज्या हिवरी गावातील नाग्रीकांनी वैक्सीन चा पहीला डोज घेतला नसेल अशा सर्व नाग्रीकांनी आधार कार्ड व मोबाईल नंबर सोबत घेऊन यावे.

तसेच आमडी आरोग्य उपकेन्द्रात ४५ वर्ष वयो गटा वरील सर्व नाग्रीकांना दुपारी १:00  वाजता पासुन वैक्सीन चा पहिला डोज देण्यात येणार आहे. तरी आपन आधार कार्ड व मोबाईल नंबर सोबत घेऊन यावे.

आमडी- हिवरी गावातील सर्व बंधु भगिनींना सावधान करू इच्छितो कि, कोरोना संपलेला नाही कृपया शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करणे आपल्यासाठी आवश्यक आहे. महत्वाचा विषय लसीकरणाचा आहे. आपल्या पारशिवणी तालुक्यात फार कमी प्रमाणात लसीकरण झाल्याचे दिसून येते.

तुम्ही लसीकरण केले नाही तर कदाचित तुम्हाला भविष्यात अनेक संकटांना तोंड द्यावे लागेल त्यामध्ये खालील बाबीचा समावेश राहील

(१)  कंट्रोलचे धान्य वाटप करतांना सरकार तुम्हाला लसीकरणाचा दाखला मागु शकते. नसल्यास तुम्हाला धान्य मिळणार नाही.

(२) अपत्यांना शाळेत प्रवेश घेतांना लसीकरणाच्या दाखल्याशिवाय कदाचित प्रवेश मिळणार नाही

(३) सरकारी कुठलाही महिना सुरु असेल आणी आपण लसीकरण केले नाही, तर तोही बंद होऊ शकतो.

(४) सरकारी कुठलीही योजना आली तर त्यामध्येही बाकी पेपर प्रमाणे आपणास लसीकरणाचा दाखला मागु शकतात.नसल्यास आपण योजनेमधून बाहेर फेकल्या जाऊ शकतो.

(५) लग्नाचे,मृत्यूचे रजिस्ट्रेशन करताना सुद्धा आपल्याला लसीकरणाचा दाखला मागु शकतात अन्यथा होणार नाही.

(६) सरकारी दवाखान्यात भरती होत असतांना सुद्धा अडचण येऊ शकते, सरकारच्या कुठल्याही योजनेमध्ये आपण बसु शकणार नाही.

अशा अनेक अडचणी भविष्यात येऊ शकतात तरी या अडचणींना सामोरे जाण्याच्या त्रासापेक्षा आजच आपल्याला लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे.

मा. मुख्यमंत्री साहेबांनी सर्व लोकांचे लसीकरण मोफत करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा आपण अवश्य घ्यावा कदाचित मोहीम संपल्यानंतर हीच लस आपणास 1000 ते 1200 रुपयाला विकत घेऊन सर्टिफिकेट घ्यावे लागेल अशी पाळी आपल्या लोकांवर येऊ देऊ नका ही नम्र विनंती. समोर च्या दृष्टीकोनातून अवगत करविण्यात आले. सौ. शुभांगी राजु भोस्कर. (सरपंच ग्रा.प.आमडी)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या