महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त महापौरांनी केले मनपा तर्फे विनम्र अभिवादन
नागपूर, ता. १३ : राष्ट्रपुरुष क्षत्रिय शुरविर महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त म.न.पा.मुख्यालयातील जुन्या इमारतीतील मुख्य दालनात महाराणा प्रतापसिंह यांच्या तैलचित्राला महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी पुष्पहार अर्पण करुन मनपा तर्फे विनम्र अभिवादन केले.
यावेळी उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांनी देखील महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पण करुन आदरांजली दिली.
यावेळी सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ विजय जोशी, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, आशीष धावडे, राजेश वासनिक उपस्थित होते.
प्रतिनिधी:- जयंत डोंगरे,नागपूर


0 टिप्पण्या