तहसील कार्यालयीन व्यवहारात राशन दुकान प्रमाणे रजिस्ट्री,राशन कार्ड,घरकुल इत्यादी कार्यालयीन व्यवहारासाठी लसीकरण प्रमाण पत्र सक्तीचे करा..! पारशिवनी तालुका दक्षता समितीचे तासिलदार यांना निवेदन
पारशिवनी:- दिनांक ०९/०६/२०२१/ ला पारशिवनी तालुका दक्षता समिती तर्फे तहसीलदार,(पारशीवनी) यांना निवेदना देऊन तहसील कार्यालयीन व्यवहारत राशन दुकान प्रमाणे रजिस्ट्री, राशन कार्ड, घरकुल इत्यादी व्यवहाराकरिता लसीकरण प्रमाण पत्र सक्तीचे करा..! असे निवेदन पारशिवनी तालुका दक्षता समितीचे निवेदन देण्यात आले.
तालुका दक्षता समिती तर्फे तहसीलदार,पारशीवनी यांना निवेदना देऊन विविध विषयांनवर चर्चा देखील करण्यात आली. तहसीलदर यांनी स्वस्त धान्य दुकान दाराला जसे आदेश दिले आहे की वैक्सीन न घेतलेल्या शिवाय शिधापत्रिका धारकांना धान्य देऊ नये. तसेच निर्देश पारशिवनी तहसील कार्यालयातील सर्व कार्यालयीन व्यवहाराकरिता सक्ती लावण्यात यावे. तसेच तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयीन कामकाजा करीता ग्राम-पंचायतीचा वैक्सीन डोज घेतल्याच प्रमाण पत्र घेतल्या शिवाय कोणतेही कामकाज करू नये. रजिस्ट्री, राशन कार्ड, घरकुल इत्यादी आदेश लावयचे असेल तर सर्वंना सारखे आदेश लावण्यात यावे असे सुचविण्यात आले . “आदेश लावाल तरच गाव १००% वैक्सीन डोज घेतलेले गाव घोशीत होईल” मा.मुख्यमंत्री श्री उद्वव ठाकरे साहेबांची योजना सफल व पुर्ण होईल. मोलमजुरी व गरीब यांच्यावर सक्ती ने आदेश देऊ सकता तर जे धनाड्य आहे त्यांच्यावर निर्बंध का बार नाही.. असा प्रश्न देखील विचारण्यात आल. जर तालुक्यात 100% लसीकरण करायचे असेल तर प्रशासन निर्देश हा सर्व परी बरोबरीचा असायला हवा. त्यात भेद भाव करून 100% लसीकरण कसा होणार ह्यावर देखील सखोल विचार मंथन करण्यात आले. पारशिवनी तालुक्याचे तहसीलदार यांच्याशी चर्चा करतांना प्रामुख्यांनी उपस्तीथ, पारशिवनी तालुका प्रमुख(शिवसेना) व पारशिवनी दक्षता समिती अध्यक्ष:- श्री. राजु भोस्कर दक्षता समिती सदस्य:- सुत्तम मस्के, सतीश भसारकर,त्रिभूवन सिंह, हर्षद गजभिये व इतर मान्यवर उपस्तीथ होते.


0 टिप्पण्या