कन्हान/सिहोरा दि. 8 जून 2021 स. 11:00 वाजता नागपुर व शहराच्या आजू-बाजू मधील विहारा मध्ये वास्तव करित असलेल्या भिक्षु-भिक्षुणी संघास किराना किट व चिवर दान करण्यात येणार.
कन्हान/सिहोरा (नागपुर):- डॉक्टर बाबासाहेब अम्बेडकर विप्शना ध्यान , वास्तु संग्रहालय ,ग्रंथालय सिहोरा (कन्हान) येथे भिक्षु-भिक्षुणी संघास जर्मनी देशातिल बुद्धिस्ट उद्योगपति थेन क्वांग (जर्मनी) यांचा मार्फ़त किराना किट दान समारोह
कोविड -19 चा माहमारी मध्ये अनेक भिक्षु -भिक्षुणी वर अत्यंत वाईट परिस्थिति निर्माण झाली. त्यांचावर उपासमारीचा प्रसंग आलेला आहे.अहिल्याबाई होळकर बहुदेशीय शिक्षण संस्थाच्या वतीने सिहोरा येथे, दिनांक 8 जून 2021 रोज़ी वेळ:- सकाळी 11:00 वाजता नागपुर शहर व नागपूर शहराच्या आजू -बाजू मधील विहारा मध्ये वास्तव करित असलेल्या भिक्षु -भिक्षुणी संघास किराना किट व चिवर दान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाची सूरवत सकाळी 10:00 वाजता भिक्षु-भिक्षुणी संघ द्वारा विशेष बुद्धवंदना ने होईल. त्यानंतर भिक्षु -भिक्षुणी संघाचे भोजनदान करण्यात येईल. जर्मनी उद्योजक सिस्टर थेन कांग,(जर्मनी) यांचा कड़ुण प्राप्त, किराना किट वाटप करण्यात येणार आहे.
उपरोक्त माहिति बुद्धा स्पिरिचूअल पार्क चे संस्थापक व अहिल्याबाई होळकर बहुउदेशिय शिक्षण संस्थाचे सचिव श्री. नितिन गजभिये यानी दिली.


0 टिप्पण्या