कोरोना युध्दात मृत झालेल्या प्रभाग 15 तील तीनही फ्रंट लाईन कोरोना वारीयर्स ला प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत द्या
नगरसेविका संध्याताई रायबोले यांची जिल्हाधिकारी कडे मागणी..!
कामठी:- कामठी येथील प्रभाग १५ चे नगर परिषद चे स्वच्छता कर्मचारी विजय गणेश बरोंडे आणि गौतम नगर छावणी येथील विणाताई धम्मरत्न तांबे, तिरंगा चौक रामगढ येथील लक्ष्मीताई रामकृष्ण ऊके या दोन अंगणवाडी सेविकाचा कोरोना प्रार्दुभावाने खासगी इस्पितळात उपचारा दरम्यान अकाली मृत्यू झाला असून, या तीनही फ्रंट लाईन हेल्थ वर्कर ला शासन नियमानुसार प्रत्येकी 50लाख रुपयांचे विमा कवच देऊन मदत करावी. अशी मागणी प्रभाग 15 च्या नगरसेविका सौ.संध्या उज्वल रायबोले यांनी गुरुवारी दिनांक 10/06/2021 ला
जिल्हाधिकारी श्री. रविंद्र ठाकरे यांना निवेदना द्वारे केली आहे.
ह्या वेळी सिओ संदिप बोरकर, तहसीलदार अरविंद हिंगे उपस्थित होते.
प्रतिनिधि:- जयंत डोंगरे, कामठी
0 टिप्पण्या