Advertisement

हॉटेल ऑंर्चीड लॉज येथे संचार बंदीच्या आदेशाचे उलंघन, कन्हान पोलिस स्टेशन अंतर्गत कार्यवाही.

हॉटेल ऑंर्चीड लॉज येथे संचार बंदीच्या आदेशाचे उलंघन, कन्हान पोलिस स्टेशन अंतर्गत कार्यवाही.

पारशिवनी:- कन्हान-कांद्री येथे सुरु असलेले हॉटेल ऑंर्चीड मध्ये संचार बंदीचा आदेशाचे उलंघन बघण्यात आले. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्शात घेता महाराष्ट्र शासनांनी जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता सर्व… बाजार बंध ठेवले आहे. अश्या नाजूक परिस्तिथी मध्ये हॉटेल ऑर्चीड मध्ये संचार बंदी चा उलंघान होत असल्याचे,  गुप्त सूत्रांच्या मदतीने पोलीस कार्यवाही मध्ये… काही गोस्टीस उघड झाली आहे.

हॉटेल  ऑंर्चीड मध्ये संचार बंधीच उलंघन करता, क्षमते पेक्षा जास्त व्यक्तींना हॉटेल मध्ये प्रवेश दिल्याचे आढळले आहे. हॉटेल ऑंर्चीड मध्ये वर्तानुकुलीत कक्षेत, क्षमतेपेक्षा महिला व पुरुष आढल्याचे व्यक्त केले आहे. पोलीस कार्यवाहीत गोष्ट समोर आल्यात.

संचार बंदीच्या काळात दिशा नेर्देशाचे पालन न करता covide19 ची तपासणी केली नसल्याचे हि उघडकीस आले आहे.तसेच आरोपीने मा. जिल्हाधिकारी तसेच शासनाच्या निर्गमित केलेल्या आदेशाचे व अटी-शर्तीचे कोणतेही पालन केल्याचे आढळले नाही.

आरोपी यांनी संचार बंदी आदेशाचे अवहेलना करून कोरोना विषाणूचा संसर्ग पसरविण्याचे कृत्य करून, लॉज सुरु ठेवले होते. त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करून कन्हान पोलीस ने सदर कार्यवाही तपासात घेतली आहे.

सदर कार्यवाही कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक त्रिपाठी, यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक कदम, पोलीस उपनिरीक्षक सुनील अंबरते, पोलीस शिपाही सुधीर चव्हाण, पोलीस शिपाही आतीष मानवटकर,  कार्यवाही करण्यात आली.आरोपी आकाश सुभास कापसे वय २३ वर्ष रा सोनी ले आउट कांद्री-कन्हान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दि.२५/०५/२०२१ च्या वेळ:- १७:०० ते १७:४५ घडल्याचे सांगितले जात आहे व गुन्हा दाखल वेळ दि. २५/०५/२०२१ वेळ:- २१:४३ सांगितले जात आहे.

गोपनीय माहितीवरून सदर कार्यवाही करण्यात आली असे सांगितले जात आहे. आपातकालीन कलम १५१/२१ कलम १८८,२६९,२७०,भादवि२३४ साथीचा रोग अधिनियम उलंघन, गुन्हा दाखल. सदर माहिती कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सदर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या