कोरोना काळात बनलेल्या राशन कार्ड धारकांना एका महिण्याचे धान्य पुढील महिण्यात मिळेल..! दक्षता समिती अध्यक्ष श्री राजू भोस्कर
पारशिवनी:- दक्षता समिती अध्यक्ष श्री राजू भोस्कर यांनी निरीक्षक अधीकारी पारशिवनी श्री पडोळे साहेब यांना दिनांक २८/५/२०२१/ गुरवार ला तहसील कार्यालय पारशिवनी कार्यालयात राशन वाटप संदर्भात भेट दिली.
पारशिवनी तालुक्यातील नवीन कार्ड धारकांना स्वस्त धान्य केव्हा वाटप होईल याबाबद विचारना केली.यावर निरीक्षक अधीकारी साहेबांनी सांगीतले की कोरोना काळात बनलेल्या कार्ड धारकांना एका महिण्याचे धान्य पुढील महिण्यात मिळेल. तसेच नवीन कार्ड धारकांना पुढील मिहण्यात धान्य वाटप होईल अशी माहिती दिली.
नवीन राशन कार्ड ,जुना(फाटलेले) राशन कार्ड,राशन कार्ड वर नाव चडवीने या कामी करीता तालुक्याती नागरीकांना विलंभ लागत असल्याची महीती ही यावेळी देण्यात आली.त्यावर निरीक्षक अधिकारी यांनी सांगीलले की नवीन रशनकार्ड धारकांना जास्तीत जास्त १ महिना नवीन कार्ड बनविण्या करीता लागेल.जुना कार्ड किव्हा राशन कार्ड वर नवीन नाव चडविण्या करीता जास्तीत जास्त १५ दिवस लागतील.
तहसील कर्यालयात ज्या राशन कार्ड धारकाचे जुने कार्ड नवीन बनवीण्याकरीता दिले असतील किव्हा राशन कार्ड वर नव चडवीण्या करीता राशन कार्ड तहसील कार्यालयात जमा असेल अशा कार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानदारानी धान्या वाटप करण्याचे आदेश तहसील कार्यालया मधुन देण्याची माहिती ही यावेळी देण्यात आली.
अध्यक्ष:- राजु भोस्कर (दक्षता समिती पारशिवनी तहसील)


0 टिप्पण्या